Nashik News : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हा सर्वाधिक पावसाचा तालुका आहे. जूनपासून पुढे सुमारे १५०० मिलिमीटरवर पाऊस होतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादनाच्या अंगाने पूर्णतः प्रतिकूल परिस्थिती असताना खेडभैरव (ता. इगतपुरी) येथील वाजे बंधूंनी अडीच एकर क्षेत्रावर क्रिमसन या रंगीत द्राक्ष वाणाची लागवड केली. त्यात एकरी ६ ते ७ क्विंटल निर्यातक्षम उत्पादन घेतले. पहिल्यांदाच भात उत्पादक पट्ट्यातील द्राक्षाची निर्यात झाली असून त्यांच्या प्रयोगशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भात हे मुख्य पीक. मात्र प्रयोगशील वृत्ती असलेल्या कैलास, संपत व नवनाथ हे भाजीपाला उत्पादनात सक्रिय होते. त्यांना द्राक्ष पिकाची माहिती त्यांना मिळाली. त्यातूनच पुढे फेब्रुवारी २०२१ मध्ये सव्वा व फेब्रुवारी २०२२ मध्ये सव्वा असे अडीच एकर क्षेत्रावर क्रिमसन या रंगीत द्राक्ष वाणाची लागवड केली. त्यानुसार मागील वर्षी पहिल्या टप्प्यातील लागवड केलेल्या बागेचे उत्पादन हाती आले होते. तर यंदा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अडीच एकर बागेत त्यांना १५ टन उत्पादन घेतले आहे.
थोरले बंधू कैलास हे अभ्यासवृत्तीचे असून त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून कृषी पदवी संपादन केली आहे. मधले भाऊ संपत हे बारावीपर्यंत शिकले तर धाकटे बंधू नवनाथ हे पदवीधर आहेत. वाजे कुटुंबियांचे २५ एकर क्षेत्र असून त्यामध्ये टोमॅटोचे लागवडी असतात. याशिवाय कोबी, फ्लॉवर, मिरची व कारले लागवड असते. फलोत्पादन पद्धतीचा अवलंब करून शास्त्रीय पद्धतीने कामकाज हे त्यांचे प्रमुख बलस्थान आहे.
प्रतिकिलो १३५ रुपयांचा दर
वडील गोपाळा यांचे मार्गदर्शन लाभत असते. एकूण १६ जणांचे एकत्रित कुटुंब आहे. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, मुरंबी परिसरात बोटावर मोजणाऱ्या शेतकऱ्यांकडे द्राक्षबागा आहेत. तर आता वाजे बंधूंनी रंगीत वाणात यंदा १५ टन उत्पादन घेतले आहे. निर्यातक्षम मालाला प्रतिकिलो १३० रुपये दर मिळाला.
गेल्या काही वर्षांत इगतपुरी तालुक्यात पावसाचे सरासरी पर्जन्यमान कमी आहे. अशी परिस्थिती असताना भात पट्ट्यात द्राक्ष उत्पादनाचा प्रयोग केला आहे. शास्त्रीय ज्ञान व कामाच्या नियोजनातून व्यावसायिक पद्धतीने होणारी द्राक्ष शेतीचे कामकाज आदर्श म्हणावे लागेल.रवींद्र निमसे, विभागीय अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.