Grape Export
Grape ExportAgrowon

Grapes Export : सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात घटण्याची शक्यता

Grape Production : जिल्ह्यातून यंदा ९५१ कंटेनरमधून १२ हजार ९७० टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यात करण्याचे प्रमाण कमी आहे.
Published on

Sangli News : जिल्ह्यातून यंदा ९५१ कंटेनरमधून १२ हजार ९७० टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यात करण्याचे प्रमाण कमी आहे. निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, अवकाळी पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा द्राक्षाची निर्यात घटण्याची शक्यता असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

सांगली जिल्ह्यातून गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. मात्र यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडला आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागा उत्तम साधल्या आहेत. दरवर्षी दुबई आणि सौदी अरेबिया या दोन देशात पहिल्यांदा द्राक्षाची निर्यात सुरू होते.

Grape Export
Grape Export : द्राक्ष निर्यातीला गती

त्यानंतर युरोपसह अन्य देशात निर्यातीस प्रारंभ होते. यंदाच्या हंगामात नैसर्गिक संकटावर मात करत दुबई आणि सौदी अरेबिया या दोन देशांत द्राक्ष निर्यात सुरू झाली आहे. जानेवारीपासून जिल्ह्यातील द्राक्ष युरोपियन देशातील विविध बाजारपेठेत पोहोचण्यास सुरुवात झाली.

गतवर्षी जिल्ह्यातून युरोपियन देशांत ८२५ कंटेनरमधून ९ हजार ७०२ टन, तर आखाती देशांत ४८९ कंटेनरने ७ हजार ६१५ टन अशी एकूण १७ हजार ९३७ टन द्राक्ष निर्यात झाले. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील ९ हजार ६२७ द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीसाठी नोंदणी केली. या वर्षी मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी पुढाकार घेतला आहे.

Grape Export
Grape Export : युरोपियन बाजारपेठेत भारतीय द्राक्षांना वाढती मागणी ; निर्यातीत १० टक्क्यांची वाढ

३ हजार ९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हंगामाच्या सुरवातीला निर्यातीला फारशी गती आली नव्हती. त्यानंतर निर्यातीची गती वाढली. युरोपियन देशात ४९५ कंटेनरमधून ६ हजार ५५८ टन, तर आखाती देशात ४५३ कंटेनरने ६ हजार ४१२ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे.

नुकसानीचा निर्यातीला फटका

वास्तविक पाहता, पाणीटंचाई आणि त्यानंतर अवकाळी पावसाचा फटका तसेच द्राक्षावर बदलत्या वातावरणामुळे करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे बागांचे नुकसान झाले. परिणामी, द्राक्ष निर्यातीला याचा फटका बसला आहे.

मागणी वाढली पण निर्यातघटीचा अंदाज

सध्या जगभरातील बाजारपेठेत द्राक्षाची मागणी वाढली असून दरही वाढले आहेत. मात्र निर्यातक्षम द्राक्ष बागांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे निर्यातीसाठी द्राक्ष पुरेशी उपलब्ध नाहीत. त्यामुळे यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यात घटेल, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com