Team Agrowon
राज्यातील द्राक्ष हंगाम ७० टक्के आटोपला आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात देशांतर्गत आणि निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात प्रति किलोस ८ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे.
सध्या द्राक्षाला प्रति किलोस ४० रुपये ५० रुपये असा दर मिळत आहे.
राज्यात द्राक्षाचे क्षेत्र साडेचार लाख इतके आहे. यंदाचा हंगाम धरण्यापासून अपुरा पाऊस झाला. त्यातच शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यातूनही शेतकऱ्यांनी फळ छाटणीचे नियोजन केले.
फळ छाटणी विभागून झाली. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा साधल्या.
सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने रोगाचाही प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे फळ छाटणीपासून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण नव्हते. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत द्राक्ष बागा साधल्या.
राज्यात आगाप फळ छाटणी सुमारे ५० हजार एकरांवरील द्राक्षाची विक्री जानेवारी महिन्यातच पूर्ण झाली होती.
सध्या राज्यातील सांगली, पुणे, आणि नाशिक या द्राक्ष विभागात अनुक्रमे २० टक्के, तर सोलापूर विभागात ५० टक्के द्राक्षाची काढणी अजून बाकी आहे. त्यामुळे सोलापूर वगळता इतर विभागातील एप्रिलअखेर हंगाम संपेल.