Nanded News: नांदेड जिल्ह्यात २२ फेब्रुवारीपासून अवकाळी पावसाची शक्यता काही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केल्याची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. तसेच २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु शेतकऱ्यांनी अधिकृत हवामान अंदाजावर लक्ष ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे..सध्या जिल्ह्यात रब्बी हंगामातील हरभरा, गहू आणि ज्वारी ही पिके काढणीच्या टप्प्यावर आहेत. अनेक ठिकाणी हरभऱ्याची काढणी सुरू असून, काही भागात गव्हाची व ज्वारीचीही कापणी वेगाने सुरू आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त होत असल्याने उभ्या पिकांसह काढणी केलेल्या शेतीमालाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे..Farmer Issues: योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत असून ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे पावसाच्या शक्यतेला बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे..विशेषत: गारपीट झाल्यास हरभऱ्याचे घाटे झडणे, गव्हाचे दाणे ओलाव्यामुळे काळे पडणे तसेच ज्वारीच्या कणसांचे नुकसान होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. काही शेतकऱ्यांनी काढणी केलेला माल शेतातच साठवून ठेवला आहे. अवकाळी पावसामुळे तो भिजण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने तातडीने काढणीचे काम पूर्ण करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवण्याची धावपळ सुरू केली आहे..Unseasonal Rain: नाशिकच्या पूर्व भागात अवकाळीमुळे तारांबळ.दरम्यान, कृषी विभागाकडून अधिकृत हवामान अंदाजावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच्या आधारे निर्णय घ्यावेत, असे सांगण्यात आले आहे..तसेच शेतकऱ्यांनी काढणी केलेला माल झाकून ठेवणे, पिकांची तातडीने कापणी पूर्ण करणे आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे. अवकाळी पावसाचा अंदाज खरा ठरल्यास जिल्ह्यातील रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती तयारी ठेवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.