Sangli News: फेब्रुवारीच्या मध्यावर जिल्ह्यातील ८३ प्रकल्पात ४८८८.५० दशलक्ष घनफूट म्हणजे ६३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ७७७१.२९ दशलक्ष घनफूट म्हणजे ९१ टक्के पाणीसाठा होता. अर्थात गेल्या तीन महिन्यांत २८ टक्क्यांनी पाणीसाठा घट झाली आहे. सद्यस्थितीला शिल्लक असलेला पाणीसाठा मेअखेर कमी पडणार असल्याचे चित्र असून दुष्काळी भागात पाणी टंचाईची झळ जाणवण्याची दाट शक्यता आहे..जिल्ह्यात पाच मध्यम व ७८ लघु अशी एकूण ८३ प्रकल्पांची संख्या आहे. या प्रकल्पात पाणी साठवण क्षमता ९३५३ दशलक्ष घनफूट इतकी आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत या प्रकल्पात ९१ टक्के पाणीसाठा होता. आटपाडी आणि तासगाव या दोन तालुक्यात शंभर टक्के पाणीसाठा होता..Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले.फेब्रुवारीच्या मध्यावर ६३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या तीन महिन्यांत पाणीसाठा झपाट्याने कमी झाला असल्याचे पाटबंधारे विभागाने केलेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे. गतवर्षी फेब्रुवारीच्या मध्याअखेर हाच पाणीसाठा ५८ टक्के होता. अर्थात चालू वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये हाच पाणीसाठा पाच टक्के आहे..जिल्ह्यात गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. सर्व धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात फारशी टंचाई भासणार नसल्याचे चित्र होते. परंतू डिसेंबर, जानेवारीपासूनच दुष्काळी भागासह अन्य भागात काही अंशी पाणी टंचाई निर्माण झाली. यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा शेतीसाठी वापरण्यात आला आहे. परिणामी पाणीसाठा कमी झाला असल्याचे चित्र आहे. मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा प्रकल्पात नाही. त्यामुळे मार्च महिन्याच्या मध्यापासून दुष्काळी भागात पाणी टंचाईची झळ सुरु होईल, अशी चित्र आहे..Water Storage: साक्री तालुक्यात प्रकल्पांतील जलसाठा मुबलक.योजनांमुळे काहीसा दिलासागेल्या महिन्यात ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरु केल्या होत्या. त्यापैकी ताकारी उपसा सिंचन योजनेचे रब्बीसाठी सुरु केलेले आवर्तन बंद करण्यात आले आहे. म्हैसाळ आणि टेंभू योजनेचे आवर्तन सुरु आहे. या तिन्हीही सिंचन योजनांच्या आवर्तनामुळे लाभ क्षेत्रातील तलावांत पाणी सोडण्यात आले होते..तालुकानिहाय प्रकल्पातील पाणीसाठी (दशलक्ष घनफूट)तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीाठा टक्केवारीतासगाव ७ ३५७.२७ ६३खानापूर ८ ४०८.६९ ७५कडेगाव ७ ३३६.५४ ५३शिराळा ५ ५५७.९४ ६३आटपाडी १३ ८८६.१४ ७७जत २७ १६५६.३५ ५५कवठेमहांकाळ ११ ५६३.३८ ६८मिरज ३ १०१.८५ ८४वाळवा २ २०.४३ ४२एकूण ८३ ४८८८.५० ६३.पूर्ण भरलेले प्रकल्प २७५ टक्के १९५० ते ७५ टक्के २९२५ ते ५० टक्के २८२५ टक्के २मृतसाठा ३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.