Jalgaon News: खानदेशात चारा पिके म्हणजेच दादर ज्वारी, संकरित ज्वारी, मका, गहू, बाजरी आदींची पेरणी यंदा सरासरीपेक्षा अधिक झाली आहे. हरभरा पेरा फारसा वाढला नाही. हा पेरा स्थिर असून, चारा पिकांची पेरणी सर्वत्र झाली आहे. कारण खरिपात चारा हवा तसा मिळाला नाही..पुढे खानदेशात यंदा चारा मुबलक राहील. यामुळे कडबा दरात घट होण्याचे संकेत आहेत. दुधाळ पशुधनासाठी चारा पुरेसा उपलब्ध होईल. सध्या हरभऱ्याचे कुटार रब्बी हंगामातून उपलब्ध होत आहे. कारण हरभरा मळणी सुरू झाली आहे..Fodder Crisis: कोरडा चारा संपण्याच्या स्थितीत.बाजरीची पेरणी खानदेशात बऱ्यापैकी झाली आहे. यातून काहीसा चारा उन्हाळ्यातही उपलब्ध होईल. त्याचे दरही आवाक्यात असतील. कृषी व पशुसंवर्धन विभागानुसार जळगाव, धुळे व नंदुरबारात सध्या चाराटंचाई नाही. पुढे सर्वत्र चारा उपलब्ध होईल. दूध उत्पादक आपल्या शेतात हिरव्या चाऱ्याची लागवड करतात. तसेच कोरडा चारा किंवा कुट्टीही त्यांच्याकडे आहे. तसेच फेब्रुवारीअखेरिस रब्बीचा चाराही मिळेल..खानदेशात गहू, दादर ज्वारी, संकरित ज्वारी व मका यांची मिळून सुमारे सव्वादोन लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही पेरणी सरासरीपेक्षा अधिक आहे. तसेच हरभऱ्याचे कुटारही मुबलक राहील. कारण हरभऱ्याचीदेखील सुमारे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिकची पेरणी झाली आहे..Green Fodder Shortage: माळशिरसमध्ये ओल्या चाऱ्याचा तुटवडा.खरिपात हानीखानदेशात खरिपाखाली एकूण १४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात सुमारे साडेसात लाख हेक्टरवर कापूस होते. सुमारे ३० हजार हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार हेक्टरवर तूर होती. तुरीचास पाला मिळत आहे. तृणधान्यवर्गीय पिके म्हणजेच चारा पिकांची तीन लाख हेक्टरवर पेरणी होती. ही पेरणी तापी, गिरणा, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्रात झाली. पण अतिपावसात चारा व पिकांची माती झाली..केळी पट्ट्यात स्थिती चांगलीजळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात केळी पट्ट्यात केळीची पाने, फुटवे, केळी कंद पशुधनास खाऊ घातले जात आहेत. नंदुरबार व शहादा, तळोदा भागात केळी पीक आहे. फक्त धुळ्यात साक्री, शिंदखेडा व धुळे तालुक्यात केळी पीक नसल्याने याचा चारा उपलब्ध नाही. तेथे रब्बीवर चाऱ्याची भिस्त आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर, पारोळा, अमळनेर, जळगाव, धरणगाव, एरंडोल या भागात चाऱ्याची समस्या नाही. तापी, गिरणाकाठी व कृत्रीम जलसाठा मुबलक असलेल्या भागात मका, दादर ज्वारी आदी पिके मळणीवर येत आहे. गहू, दादर ज्वारीचा चारा पुढील आठवड्यात उपलब्ध होण्यास सुरवात होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.