Expired Pesticide Agrowon
ॲग्रो विशेष

Expired Pesticides: जुन्या कीटकनाशकांची नव्या पॅकिंगमधून विक्री

Fake Pesticides: अकोल्यात कीटकनाशक कंपनीवर जिल्हा भरारी पथकाने छापा मारून तब्बल २२ लाखांचे कालबाह्य कीटकनाशक नव्या बाटल्यांत भरून विक्री करण्याचा प्रकार उघड केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

 गोपाल हागे

Akola News: कालबाह्य कीटकनाशके नव्या बाटल्यांमध्ये टाकून त्यावर नवे लेबल लावून शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. व्ही. जे. क्रॉप सायन्स प्रा.लि. नावाच्या कंपनीच्या कीटकनाशक उत्पादन स्थळावर जिल्हा भरारी पथकाने कारवाई करीत २२ लाखांच्या मुदतबाह्य साठ्यावर विक्री बंदी लावली.

याबाबत कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अकोला एमआयडीसी परिसरातील व्ही. जे. क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कीटकनाशक उत्पादन स्थळावर जिल्हा भरारी पथकाने रविवारी (ता. २०) छापा मारला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या उपस्थितीत ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) सुधाकर खंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला आहे.

कारवाईदरम्यान भरारी पथक प्रमुख तथा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीश दांडगे, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) श्री. खंडारे, राहुल सिरसाठ, कैलास राठोड व गौरव राऊत उपस्थित होते.

या कंपनीत जुन्या मुदतबाह्य कीटकनाशकांच्या बाटल्या फोडून त्यातील सामग्री नवीन बाटल्यांमध्ये भरून त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक असलेले स्टीकर लावण्याचे काम सुरू होते.

याप्रकरणी कीटकनाशके कायदा १९६८ व नियम १९७१ नुसार कंपनीकडे असलेल्या सुमारे २१ लाख ९५ हजार २८० रुपये किमतीच्या मुदतबाह्य साठ्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच उत्पादन स्थळावरून आठ कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule: देशावर मोठे संकट, सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी, शेती प्रश्नांकडेही वेधले लक्ष

Tomato Harvester: टोमॅटो काढणी आता मशीनने; कमी वेळात जास्त क्षेत्राची काढणी शक्य!

MP Bhaskar Bhagre: सहकारी बँकांच्या संचालकांच्या नव्या निकषांबाबत पुनर्विचार व्हावा

IAS Kirti Kiran Pujara: महापुरुषांचे पुतळे उभारताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा

PUM Impact Award: ‘गोविंद फाउंडेशन’चा ‘पम इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

SCROLL FOR NEXT