Expired Pesticides: मुदतबाह्य कीटकनाशकांमुळे राज्यातील निविष्ठा विक्रेते हैराण

Agri Dealers: राज्यातील कृषी निविष्ठा केंद्रांमध्ये पडून असलेल्या मुदतबाह्य कीटकनाशकांचे काय करायचे, असा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे.
Expired Pesticides
Expired PesticidesAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यातील कृषी निविष्ठा केंद्रांमध्ये पडून असलेल्या मुदतबाह्य कीटकनाशकांचे काय करायचे, असा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे. हैराण झालेल्या विक्रेत्यांनी आता निविष्ठा कंपन्यांच्या विरोधात शासनाकडे दाद मागितली आहे.

महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाईड्स सीडस् डिलर्स असोसिएशनच्या (माफदा) शिष्टमंडळाने अलीकडेच राज्य शासनाला निवेदन दिले. तसेच, राजशिष्टाचार व पणन विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेत समस्या सांगितल्या. या वेळी ‘माफदा’चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील व सचिव संजय अग्रवाल उपस्थित होते.

Expired Pesticides
Farmer ID : फार्मर आयडीसाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत

‘‘कृषी विभागाकडील अधिकृत विक्री परवाना असलेले हजारो कीटकनाशक विक्रेते राज्यात आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा पडून आहे. हा साठा कायदेशीरदृष्ट्या तांत्रिक व शास्त्रीय मार्गदर्शनाखालीच नष्ट करावा लागतो. मात्र, विक्रेत्यांकडे साठा नष्ट करण्याची कोणतीही यंत्रणा नाही.

‘तुमचा मुदतबाह्य साठा ताब्यात घ्या’, असा तगादा संबंधित निविष्ठा कंपन्यांकडे विक्रेत्यांनी लावलेला आहे. परंतु, विक्रेत्यांना एकही कंपनी दाद देण्यास तयार नाही. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याला हा साठा घातक ठरू शकतो. त्यामुळे तो ताब्यात घेऊन नष्ट करण्याचे आदेश संबंधित निविष्ठा कंपन्यांना राज्य शासनानेच द्यावेत,’’ असे ‘माफदा’चे म्हणणे आहे.

Expired Pesticides
Pesticide Residue Lab: राज्यातील कीडनाशक अंश प्रयोगशाळा मोजताहेत अंतिम घटका

राज्यात विविध कंपन्यांकडून रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशकांचा पुरवठा केला जातो. या निविष्ठा विक्रीला जाण्यापूर्वीच प्रत्येक लॉटची तपासणी कृषी विभागाकडून व्हावी. विक्रेत्यांकडे केवळ तपासणीअंती सीलबंद केलेला माल पाठवला जावा.

त्यामुळे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना अप्रमाणित माल विकला जाण्याचा मुद्दा निकालात निघेल. कोणत्याही कंपनीने तपासणी न केलेल्या लॉटचा माल बाजारपेठेत आणू नये, अशी भूमिका कृषी विभागाने घ्यावी व उल्लंघन केल्यास कंपनीविरोधात कारवाई करावी, असेही ‘माफदा’चे म्हणणे आहे.

प्रयोगशाळांची गुणवत्ता वाढवा

कृषी विभागाच्या प्रयोगशाळांमधून विविध जिल्ह्यांमधील खते व बियाण्यांची नियमित तपासणी होते. प्रयोगशाळांकडून अनेकदा या निविष्ठा अप्रमाणित ठरविल्या जातात. परंतु याच लॉटच्या निविष्ठांमधून शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस उत्पादन येत असल्याचे वारंवार आढळून येते.

यातून प्रयोगशाळांची नमुना तपासणीची पद्धत सदोष असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे प्रयोगशाळांच्या गुणवत्तेत तातडीने सुधारणा व्हावी, अशी मागणी ‘माफदा’ने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com