Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात थोर पुरुषांचे पुतळे उभारण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सादर करावा. काही ठिकाणी युवावर्ग अतिउत्साहात चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी पुतळे उभारतात. हे अत्यंत चुकीचे आहे. थोर पुरुषांचे पुतळे उभारताना राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून तत्वाचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले..जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे उभारण्याबाबतच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त त्र्यंबक ढेंगळे उपस्थित होते. .PA Retirement Farewell:...अन् जिल्हाधिकारी झाले बॉडीगार्ड ! .पूजार म्हणाले की, पुतळा उभारण्यास अधिकृत परवानगी असली तरच संबंधित पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी मिळू शकतो. चुकीच्या पद्धतीने पुतळे उभारल्यास कायमचे नुकसान आहे. ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे, त्या ठिकाणी तो उभारण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. .Sant Sevalal Maharaj Jayanti: संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव नियोजनात त्रुटी नको.चुकीच्या पद्धतीने पुतळा उभारणार्या युवा वर्गावर एकदा एफआयआर दाखल झाला तर युवा वर्गाचे भविष्य कायमचे खराब होते. त्यामुळे पुतळा उभारताना आवश्यक त्या परवानग्या घेऊनच पुतळा उभारावा. डॉ. घोष म्हणाले की केवळ परवानगी घेऊनच पुतळा उभारून चालणार नाही तर त्याची देखभाल करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे..पुतळा उभारणार्या संस्थेने पुतळ्याच्या क्ले मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेऊनच पुतळा तयार करावा. मान्यता घेतलेल्या मॉडेल प्रमाणेच पुतळा उभारण्याची दक्षता घ्यावी. पोलीस अधीक्षक खोखर म्हणाल्या की वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घेऊनच पुतळा उभारावा. चुकीच्या पद्धतीने व विनापरवानगीने जिथे पुतळे उभारले आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. या वेळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.