Agriculture Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Processing : अकोला जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योगांचा विस्तार शक्य

Processing Industry : राज्याच्या वार्षिक सकल उत्पादनात जिल्ह्याचा वाटा केवळ १.१७ टक्के असून तो वाढण्यासाठी विविध उद्योगांचा विस्तार होणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Akola News : राज्याच्या वार्षिक सकल उत्पादनात जिल्ह्याचा वाटा केवळ १.१७ टक्के असून तो वाढण्यासाठी विविध उद्योगांचा विस्तार होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग विस्ताराची शक्यता व संधी असून नवउद्योजक व उद्योजकांनी त्यादृष्टीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्रातर्फे व्यवसाय सुलभीकरण व विविध बाबींबद्दल उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘इग्नाइट महाराष्ट्र- २०२४’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्योग उपसंचालक रंजना पोळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, युनिव्हर्सल एक्सपोर्टचे प्रवीण वानखडे,

निर्यात मार्गदर्शक अंकित गुप्ता, ध्रुव पारेख, ‘एनआयए’चे मुख्य व्यवसाय व्यवस्थापक आनंद अमृतकर, कामगार सहायक आयुक्त भास्कर लोंढे, टपाल खात्याचे उपअधीक्षक एस. एम. हिवराळे, नाबार्ड अधिकारी श्रीराम वाघमारे, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, भगवंत अनवणे, प्रसन्न रत्नपारखी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार पुढे म्हणाले, ‘‘राज्याच्या औद्योगिक क्षेत्रातील जिल्ह्याचा वाटा वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. आता उद्योग-व्यवसायांतील वार्षिक उलाढाल ३६ हजार कोटी रुपये आहे. त्यात वाढ होण्यासाठी कृषी उद्योगाचा विस्तार करताना नव्या निर्यात संधींचाही शोध घेतला पाहिजे.

कृषी उद्योग, फळप्रक्रिया आदींसाठी शासन व बँकांतर्फे विविध योजना राबविल्या जातात. मूर्तिजापूर एमआयडीसीमध्येही विकासाच्या शक्यता आहेत. येथील उत्तम महामार्ग, रेल्वे संपर्क चांगला आहे. विमानतळ विकासासाठी प्रयत्नरत आहोत,’’ असे त्यांनी सांगितले. श्रीमती पोळ यांनी प्रास्ताविक केले. अंकिता पाचंगे यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT