Agriculture Land Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Land Dispute : ठकास भेटला महाठक

Agriculture Land Selling : एका गावात रामसिंग नावाचा एक मोठा बागायतदार राहत होता. गावात कोणत्याही शेतकऱ्याने जरी जमीन विकायला काढली तर विकायला काढलेल्या प्रत्येक जमिनीवर रामसिंगचा डोळा असायचा.

शेखर गायकवाड

एका गावात रामसिंग नावाचा एक मोठा बागायतदार राहत होता. गावात कोणत्याही शेतकऱ्याने जरी जमीन विकायला काढली तर विकायला काढलेल्या प्रत्येक जमिनीवर रामसिंगचा डोळा असायचा. गावातील जमीन विकणार आहे असे त्याला कळाले की, तो जमिनीचा भाव समोरच्याला वाढवून सांगायचा आणि विसार देऊन जमीन अडकवून ठेवायचा. गावात ज्या ठिकाणी रामसिंगची जमीन होती त्याच्या शेजारीच दिलीप नावाच्या शेतकऱ्याची जमीन होती. दिलीप ने ती जमीन विकायला काढली.

ही गोष्ट रामसिंगला समजल्याबरोबर रामसिंगने दिलीपला विकायला काढलेल्या दोन शेतजमिनींबद्दल मोठी रक्कम विसार म्हणून दिली. थोड्याच दिवसात जमिनीचे बाजार वाढतील व आपल्याला मोठा नफा मिळेल, असा रामसिंगचा अंदाज होता. परंतु रामसिंगचा शेजारी दिलीप फार हुशार होता. दिलीपला रामसिंगचे सगळे कारनामे माहीत होते. दिलीपने ती जमीन परस्पर जास्त रकमेचे खरेदीखत करून तिसऱ्याच व्यक्तीशी गंगारामला व्यवहार करुन विकून टाकली.

ही गोष्ट जेव्हा रामसिंगला कळाली तेव्हा तो दिलीप सोबत जमिनीच्या झालेल्या व्यवहाराबाबत वाद घालू लागला. परंतु दिलीपने सामंजस्य दाखवून त्याचा घेतलेला विसार त्याला परत देऊन टाकला व रामसिंग सोबतचा वाद मिटवून टाकला. दिलीपने वाद मिटवून टाकला पण त्यात दिलीपचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला होता.

रामसिंग गावातील इतर लोकांना फसवून स्वतःचा फायदा करुन घ्यायचा परंतु त्याला फसवणारा दिलीप हा त्याला महाठक मिळाला होता. सांगावयाचे तात्पर्य म्हणजे जो सतत दुसऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतो त्याला सुद्धा कोणीतरी महाठक भेटतो हे निश्चित आहे! ही गोष्ट जमीन व्यवहाराबद्दल अनेक वेळा घडताना आपण पाहतो.

शर्तीच्या जमिनीवरही कर्ज काढता येते

एका गावात मदन नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. सरकारकडून मदनला भूमिहीन म्हणून जमीन मिळाली होती. मदनला जमीन ताब्यात मिळताना सातबारा वर नवीन शर्तीची जमीन असा शेरा आला. मदनला जमीन मिळाली पण मदनची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला जमिनीची सुधारणा करण्यासाठी कर्जाची गरज भासू लागली. या जमिनीवर कर्ज मिळू शकते का? अशी मदनने अनेक लोकांकडे चौकशी केली.

लोकांनी मदनला सांगितले की, ‘‘सरकारने तुला सवलतीच्या दराने आणि शर्तीवर जमीन दिली आहे. तुला कर्ज कोणती बँक देणार? शिवाय कर्ज नाही फेडले तर कशातून वसूल करणार?” मदनने जमिनीची सुधारणा करण्यासाठी कर्ज काढण्यासाठी बँकेमध्ये अर्ज केला. परंतु बँकेमध्ये अर्ज दिल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी मदनला जिल्हाधिकारी यांचा शर्तीची जमीन असल्यामुळे ना हरकत दाखला आणायला सांगितला.

मदन कलेक्टर कचेरीत चकरा मारून त्रासून गेला होता पण कलेक्टर कचेरीमध्ये त्याला कोणीही या कर्ज प्रकरणाबद्दल माहिती देत नव्हते. आमच्या कार्यालयाने असा दाखला यापूर्वी कधीच कोणाला दिलेला नाही एवढेच उत्तर मदनला मिळत होते. वास्तविक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार कलम ३६(४) नुसार नवीन शर्तीच्या जमिनीवर कर्ज काढता येते व त्यासाठी कुठल्याही ना हरकत दाखल्याची गरज नाही.

मदनने गावातील इतर लोकांना सुद्धा याबाबत विचारणा केली. परंतु गावातील लोकांना सुद्धा या जमिनीच्या प्रकरणाबाबत काहीही सांगता येत नव्हते. परंतु बँकेला तसेच महसूल अधिकाऱ्याला ही तरतूद माहिती नसल्यामुळे दोन वर्षे मदनचे कर्ज प्रकरण मंजूर झाले नाही.

सांगावयाचे तात्पर्य म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम ३६(४) नुसार नवीन शर्तीच्या जमिनीवर कर्ज देताना पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नाही. जमिनीत सुधारणा करण्यासाठी कर्ज घेण्याचा नवीन शर्तीने जमीन मिळालेल्या भूमिहीन व्यक्तीस अधिकार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT