Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : अकोल्यातही पीककर्जाचा लक्ष्यांक अपूर्णच

Kharif Season : खरीप हंगामासाठी १२७५ कोटींची यंदा तरतूद करण्यात आली. मात्र, पीककर्ज नूतनीकरणापासून अनेक शेतकरी दूर असल्याने वाटपाचा लक्ष्यांक पूर्ण होऊ शकलेला नाही.

Team Agrowon

Akola News : खरीप हंगामासाठी १२७५ कोटींची यंदा तरतूद करण्यात आली. मात्र, पीककर्ज नूतनीकरणापासून अनेक शेतकरी दूर असल्याने वाटपाचा लक्ष्यांक पूर्ण होऊ शकलेला नाही. अद्यापही साडेचारशे कोटी रुपयांची रक्कम शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे.

या भागात प्रत्येक जिल्ह्यात पीककर्ज नूतनीकरण न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने यंदा नियोजित निधी वाटप होण्याची शक्यता कमी झाली आहे.

खरीप हंगामासाठी या वर्षात शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.३०) पूर्वी पीककर्जाचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. त्याशिवाय नवीन पीककर्जासाठी हे शेतकरी पात्र ठरणार नाहीत. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी ३० जूनपूर्वी नूतनीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

विविध बॅंकांकडून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले जात आहे. सन २०२३-२४ या वर्षात अकोला जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ९५० शेतकऱ्यांना १२७५ कोटी रुपये खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. जिल्ह्यात २६ जूनपर्यंत ७६ हजार ४८२ शेतकऱ्यांना ८०२ कोटी ४० लाखांचे खरीप पीककर्ज वाटप झालेले आहे.

जिल्ह्यातील नव्याने पीककर्ज घेण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज मागणी अर्ज बॅंकांकडे दाखल करावेत आणि नूतनीकरणापासून दूर असलेल्या शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी पीककर्जाचे नूतनीकरण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

‘पीककर्जाचे नूतनीकरण गरेजेचे’

खरीप पीककर्ज वाटपाचे निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप होणे गरजेचे आहे. यासाठी गेल्या हंगामातील पीककर्ज भरून नूतनीकरण करणे आवश्यक आहे. सर्व बॅंका पीककर्ज वाटपासाठी गावोगावी शिबिरे घेत आहेत. शेतकऱ्यांच्या घरी जाऊनही पीक कर्जाच्या नूतनीकरण करण्याबाबत आवाहन करीत आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अल्प मुदतीच्या पीक कर्जाची परतफेड ३६५ दिवसांच्या आत किंवा दरवर्षी ३० जून रोजी किंवा त्यापूर्वी केलेले असावे.

पीककर्ज वाटप

लक्ष्यांक- १२७५ कोटी

प्रत्यक्ष वाटप - ८०२ कोटी ४० लाख

शिल्लक रक्कम- ४७३ कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT