Crop Loan Distribution : पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात २०० कोटी रुपयांची वाढ

Crop Loan Parbhani Update : सुधारित कृषीकर्ज नियोजन आराखड्यानुसार परभणी जिल्ह्यातील यंदाच्या (२०२३-२४) आर्थिक वर्षातील पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टामध्ये २०० कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
Crop Loan Distribution
Crop Loan DistributionAgrowon
Published on
Updated on

Parbhani Crop Laon News : सुधारित कृषीकर्ज नियोजन आराखड्यानुसार परभणी जिल्ह्यातील यंदाच्या (२०२३-२४) आर्थिक वर्षातील पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टामध्ये २०० कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

त्यानुसार यंदा खरीप पीककर्जाचे १ हजार ३८४ कोटी १७ लाख रुपये व रब्बी साठी ७४४ कोटी ८३ लाख रुपये मिळून एकूण २ हजार १२९ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आहे.

Crop Loan Distribution
Crop Loan : पीककर्ज वाटपात बँकांचे आडमुठे धोरण

यंदा याआधी खरिपासाठी १ हजार २६४ कोटी ४३ लाख रुपये व रब्बीसाठी ६६४ कोटी ५४ ला लाख रुपये मिळून एकूण १ हजार ९२८ कोटी ९७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. दरम्यान, यंदाच्या खरिपात गुरुवार (ता. १५) अखेर ४१ हजार १०९ शेतकऱ्यांना ३०३ कोटी ५१ लाख रुपये (२१.९३ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

सुधारित उद्दिष्टांनुसार खरिपात राष्ट्रीयीकृत बँकांना (व्यापारी बँका) एकूण ८९३ कोटी २६ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २०९ कोटी ९४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १६४ कोटी ९३ लाख रुपये, खासगी बँकांना ११६ कोटी ४ लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे.

रब्बी हंगामात राष्ट्रीयीकृत बँकांना (व्यापारी बँका) एकूण ४२२ कोटी ८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १०६ कोटी २१ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १६१ कोटी ९१ लाख रुपये, खासगी बँकांना ५४ कोटी ६३ लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे

पीककर्जीचे २१.९३ टक्के वाटप...

यंदाच्या खरिपात गुरुवार (ता. १५) अखेर राष्ट्रीयीकृत बँकांनी ५ हजार ८६५ शेतकऱ्यांना ६५ कोटी ४० लाख रुपये (७.३२ टक्के) पीककर्ज वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १३ हजार २८१ शेतकऱ्यांना १२९ कोटी २४ लाख रुपये (६१.५६ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २१ हजार ५२० शेतकऱ्यांना १०२ कोटी १२ लाख (६१.९२ टक्के), खासगी बँकांनी ४४३ शेतकऱ्यांना ६ कोटी ७५ लाख रुपये(५.८२ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

आजवर जिल्ह्यातील १७ हजार ८७३ शेतकऱ्यांनी १८१ कोटी ९ लाख रुपयांच्या पीककर्जाचे नूतनीकरण केले तर एकूण २३ जार २३६ शेतकऱ्यांना १२२ कोटी ४२ लाख रुपये नवीन पीककर्ज देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com