Solar Panel Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Panel : चार महिने उलटूनही सौर पॅनेलची दुरुस्ती होईना

Solar Energy : जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ या महिन्यात वादळी वारा, पाऊस झाला होता. या आपत्तीत मेहकर तालुक्यात काही गावांमध्ये मोठे नुकसानही झाले.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ या महिन्यात वादळी वारा, पाऊस झाला होता. या आपत्तीत मेहकर तालुक्यात काही गावांमध्ये मोठे नुकसानही झाले. तालुक्यातील बेलगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील सौरऊर्जा कृषी पंपाचे पॅनेल तुटून पडले होते. याबाबत तक्रार करूनही अद्याप कुठलीही दखल कंपनीने घेतली नसल्याने शेतकरी प्रतीक्षा करीत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेलगाव (ता. मेहकर) येथील वेणू भगवंतराव वानखेडे यांच्या शेतातील सौर पंपाच्या पॅनेलचे २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या वादळात नुकसान झाले होते. त्यांच्याकडे तीन अश्‍वशक्तीचा कृषिपंप बसवलेला आहे.

याबाबत त्यांनी कंपनीला सूचित केले. कंपनी प्रतिनिधीच्या सुचनेनुसार पाच जणांच्या उपस्थितीत पंचनामा करून देण्यात आला. ३० नोव्हेंबरला तलाठी, सरपंच, पोलिस पाटील या पंचनाम्याच्यावेळी उपस्थित होते. त्यानंतर अद्याप कंपनीनी कुठहीली दखल न घेतलेली नाही.

एकीकडे शेतकऱ्यांनी सौर उर्जेचा वापर वाढवावा यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. असे असताना ज्यांनी कृषी पंप बसवले आहेत, त्यांना संबंधितांकडून नंतर सेवा वेळेत मिळत नसल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यावर लक्ष देणारी कुठलीही यंत्रणा नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

सेवेबाबत कंपनीकडून टाळाटाळ

या शेतकऱ्यांनी आपल्या मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार दिली. त्यानंतर संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पंचनामा कॉपी व इतर कागदपत्रे मागवले. शेतकऱ्यांनी ही सर्व कागदपत्रे पुरवली. मात्र चार महिने लोटूनही या कंपनीकडून कुठल्याही प्रकारची पुढील सेवा देण्यात आलेली नाही. नोव्हेंबर महिन्यात वादळामुळे बेलगाव परिसरात सात ते आठ शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे सौर पॅनेल नुकसानग्रस्त झालेले आहेत.

मात्र कुठल्याही शेतकऱ्याला अद्याप सेवा देण्यात आलेले नाही. दुसरीकडे या कंपनीची मुख्यमंत्री पोर्टलवर सर्रास जाहिरात केली जाते आणि सेवेबाबत मात्र दुर्लक्ष करण्यात येते. सध्या कंपनीचा टोल फ्री क्रमांक किंवा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. कंपनीचे जिल्हा तालुक्याला कुठले कार्यालय नाही. यामुळे संबंधित कंपनीला शासन कशासाठी पाठीशी घालते आहे असा आरोप या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ॲग्रोवनशी बोलताना केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss: पावसामुळे भिजून कोथिंबीर मातीमोल

Gramin Bharat Festival: ग्रामीण भारत महोत्सव एक आदर्श उपक्रम

Onion Farmers Protest: कानगाव येथे कांदा उत्पादकांचे बेमुदत धरणे

Market Committees Nationalization: राष्ट्रीय बाजाराची अधिसूचना १५ दिवसांत : पणनमंत्री रावल

Jaykumar Rawal: ‘एनआयपीएचटी’मध्ये जागतिक पातळीवरील प्रशिक्षण द्या

SCROLL FOR NEXT