Solar Pump Scam : सौरपंपांच्या लाभासाठी राहा फसव्या संदेशापासून सावध

Mahakrushi Urja Abhiyan : महाकृषी ऊर्जा अभियान ‘पीएम-कुसुम घटक-ब’ योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेशाद्वारे (एसएमएस) लिंक पाठविली जात आहे. खोट्या, फसव्या संकेतथळांना भेट देऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारचे पैसे भरू नयेत,’’ असे आवाहन ‘महाऊर्जा’ कार्यालयाने केले आहे.
Solar Pump
Solar PumpAgrowon

Pune News : ‘महाऊर्जा’मार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘कुसुम-ब’ योजनेच्या लाभासाठी बनावट संकेतस्थळावरून व संदेशाद्वारे महाकृषी ऊर्जा अभियान ‘पीएम-कुसुम घटक-ब’ योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेशाद्वारे (एसएमएस) लिंक पाठविली जात आहे.

नागरिकांनी या खोट्या, फसव्या संकेतथळांना भेट देऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारचे पैसे भरू नयेत,’’ असे आवाहन ‘महाऊर्जा’ कार्यालयाने केले आहे.

Solar Pump
Solar Pump : शेतकऱ्यांनी सौरपंपाचा लाभ घ्यावा

पंतप्रधान कुसुम-ब योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ३. ५ व ७.५ अश्‍वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. याकरिता केंद्र व राज्य शासनामार्फत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास ९० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ९५ टक्के अनुदान दिले जाते.

Solar Pump
Solar Power Project : झोडगेत होणार सौरऊर्जा प्रकल्प

सौर कृषिपंपांसाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास १० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा संदेश पाठविला जातो.

...इथे साधा अधिक माहितीसाठी संपर्क

योजनेच्या अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या (मेढा) अधिकृत संकेतस्थळाला (www.mahaurja.com) भेट द्यावी किंवा ०२०-३५०००४५० या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे विभागीय महाव्यवस्थापक ए. व्ही. कुलकर्णी यांनी कळविले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com