Crop Insurance Scheme agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme : भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पिक विमा दिला, कृषीमंत्र्यांचे अजब वक्तव्य

Agriculture Minister Manikrao Kokate : राज्यात १ रूपया पीक विमा घोटाळ्यावरून महायुती सरकारवर जोरदार टीका होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक वादग्रस्त विधान केले होते.

sandeep Shirguppe

Maharashtra Crop Insurance Scam : राज्यात १ रूपया पीक विमा घोटाळ्यावरून महायुती सरकारवर जोरदार टीका होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांनी पुन्हा एक वक्तव्य केल्याने चर्चा सुरू झाली आहे. हल्ली भिकारीसुद्धा १ रुपया घेत नाही. पण आम्ही १ रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला. असे वक्तव्य मंत्री कोकाटे यांनी केले. शुक्रवारी (ता.१४) अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मंत्री कोकाटे म्हणाले की, "महायुती सरकारने १ रुपयात पीक विमा योजना सुरु केली. परंतु, काहींनी त्याचा गैरफायदा घेतला. पीक विमा योजना यशस्वी होण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळायला हवा. पीक विमा योजना सुरू झाल्यापासून महायुती सरकारला अनेक चांगले-वाईट अनुभव आले आहेत. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटतात. सरकारला पीक विमा योजना बंद न करता यात सुधारणा करायच्या आहेत".

"पीक विम्याबाबतीत शेतकऱ्यांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात येणार आहे पीक विम्यातील ४ लाख अर्ज नामंजूर करण्यात आले. कृषी विभागामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे आकृती बंद करून नवीन भरती संदर्भात शासन विचारात आहे". असे कृषीमंत्री कोकाटे म्हणाले.

कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना संपर्क साधण्यासाठी १ सिरीजमध्ये नंबर देणार आहे. कृषी मंत्र्यापासून तर शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत हा परमनंट नंबर असणार आहे. अशीही माहिती कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली. तसेच पीक विमा योजनेत बाकीच्या राज्यातील लोकांनी ऑनलाईन अर्ज केले यामुळे अनेकप्रकारचा गैरकारभार झाला. पीक विम्याचे अर्ज खूप जमा झाले. सगळ्यांना वाटलं पीक विमा खूपच चांगली योजना आहे. पण प्रत्यक्ष चौकशी केल्यावर आम्हाला कळलं की आम्ही ४ लाख अर्ज नामंजूर केलेत. असेही कोकाटे यांनी सांगितलं.

एजन्सी वाल्यांचा कारभार?

"पीक विमा प्रकारावरून सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही. पण ज्या पद्धतीने लोक अर्ज भरतात, कुठेतरी एजन्सी केंद्रवाले हे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे. त्याची चौकशी सुरु आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितलं आहे. पण याच्यात सुधारणे करणे आवश्यक आहे". असे मंत्री कोकाटे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT