Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Production : भात उत्‍पादकांमध्ये उत्‍साह

Paddy Procurement : मुरूड तालुक्यातील आंबोली येथील आदिती अॅग्रो खार अंबोली या हमीभाव भात खरेदी केंद्रावर आतापर्यंत १८ हजार क्विंटलची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे.

Team Agrowon

Murud News : मुरूड तालुक्यातील आंबोली येथील आदिती अॅग्रो खार अंबोली या हमीभाव भात खरेदी केंद्रावर आतापर्यंत १८ हजार क्विंटलची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. गतवर्षी २०४० रुपये प्रति क्विंटलच्या दरात भात खरेदी झाली होती. यंदा मात्र २,१८३ रुपये इतका हमी भाव राज्य शासनाच्या पणन विभागाकडून मिळाल्याने भात उत्पादकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा वाढीव बोनस जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भात उत्‍पादाकांकडून करण्यात येत आहे.

मुरूड तालुक्यात एकूण तीन भातविक्री केंद्र असल्याने शेतकरी वर्गाला भात विक्रीसाठी नजीकच्या केंद्रात जाणे शक्य होत आहे. तालुक्यात खार आंबोली, बोर्ली -मांडला व तळेखार येथे भात हमीभाव केंद्र उघडण्यात आली आहेत. पूर्वी भाताची काढणी झाल्या नंतर खासगी व्यापारी अल्प मोबदल्यात भात खरेदी करत असत. त्यामुळे भातशेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला होता.

मिठागर, सावली, नांदले, उसरोली, टोकेखार, आगरदांडा, जमृतखार, हाफिजखार, उंडरगाव, वाणदे, जोसरांजण, शिघ्ने, नवी वाडी, नागशेत, वावडुंगी, वेळास्ते, आदाड, नांदगाव आदी गावातून येथील केंद्रांवर खरीप हंगामाचा भात आणला जातो. यंदा शासनाच्या पणन विभागाकडून २१८३ हमीभाव दिल्‍याने भात उत्‍पादकांमधून समाधान व्‍यक्‍त केले जात आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होत आहेत. त्‍यामुळे यंदा केवळ आंबोली येथील आदिती ॲग्रो खार केंद्रावर आतापर्यंत १८ हजार क्‍विंटल विक्रमी भात खरेदी झाली आहे. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यंदा बोनस सरकारने अद्यापही जाहीर न केल्याची तक्रार उंडरगावचे शेतकरी महादेव नागोजी भोईट यांनी केली आहे. त्‍यामुळे तो लवकर जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुरुड तालुक्यात भात लागवड क्षेत्र ३३०० हेक्टर आहे.

पेरणीसाठी जास्‍त खर्च

भात शेतीला पेरणीपासून काढणीपर्यंत एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च करावा लागतो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सामाईकरित्या शेतात माणसे राबायची. त्यामुळे भात शेती परवडत होती. आता मात्र मजुरांची समस्या भेडसावत असून भात पेरणी ते काढणीपर्यंत करावा लागणाऱ्या खर्चाची उत्पन्नातून जेमतेम तोंड मिळवणी होत असल्याची व्यथा शेतकरी वर्ग मांडत आहे.

हमीभाव केंद्रावर भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सरसकट बोनस द्यायचा याचा शासन आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही.
के. बी. ताटे, पणन अधिकारी, रायगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT