पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना ४२ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या ऐतिहासिक योजनांची भेट देतीलकडधान्ये अभियान आणि पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना होणार सुरुशेतमाल उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न .PM Narendra Modi to launch PM Dhan Dhanya Krishi Yojana and Pulses Mission: शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असतानाच, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांची प्रगती आणि समृद्धीसाठी ४२ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या ऐतिहासिक योजनांची भेट देतील. या दिवशी पंतप्रधान मोदी कडधान्ये अभियान आणि पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या योजनांचा नवी दिल्ली येथून शुभारंभ करतील, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी दिली. .देशभरात शेतमाल उत्पादकता एकसमान नाही; काही भागात ती खूप कमी आहे तर काही भागात अधिक आहे. आम्ही कमी उत्पादकता असलेले जिल्हे ओळखून आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. जर कमी प्रमाणात उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांचे उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या बरोबरीने आणले तर देशाचे एकूण उत्पादन वाढण्यास मदत होईल. यामुळे देशांतर्गत गरज पूर्ण होईल आणि त्या संबंधित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. आम्ही अशा १०० जिल्ह्यांची निवड केली असून ज्यावर आमचे लक्ष केंद्रित असेल. पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेअंतर्गत या जिल्ह्यांमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे चौहान यांनी सांगितले..PM Dhan Dhaanya Krishi Yojana: पीएम धन-धान्य कृषी योजनेसाठी देशातील १०० जिल्ह्यांची निवड, महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?.ते पुढे म्हणाले की, भारत अजूनही कडधान्यांच्या बाबतीत स्वावलंबी झालेला नाही. कडधान्यांत आत्मनिर्भर होण्यासाठी, २०३०-३१ पर्यंत कडधान्ये अभियान निश्चित केले आहे. या दरम्यान, कडधान्यांच्या लागवडीखालील क्षेत्र २७५ लाख हेक्टरवरून ३१० लाख हेक्टरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचबरोबर, कडधान्यांचे उत्पादनही २४२ लाख टनांवरून ३५० लाख टनांवर नेण्याचा प्रयत्न राहील..याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आणि अन्य शेतकऱ्यांशी संवाद साधतील..Pulses Production: कडधान्ये उत्पादन वाढीसाठी ६ वर्षांचा रोडमॅप तयार, अतिरिक्त ३५ लाख हेक्टरवर लागवडीचे लक्ष्य, २ कोटी शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?.या दिवशी पंतप्रधान मोदी पीएम किसान योजनेचा (PM Kisan 21st Installment) २१ वा हप्ता जारी करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण, कृषिमंत्री चौहान यांच्या पत्रकार परिषदेनंतर, हे स्पष्ट झाले की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता ११ ऑक्टोबर रोजी जारी होणार नाही. यामुळे ९.७ कोटी शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळण्याची प्रतीक्षा लांबली आहे..दिवाळीपूर्वी मिळणार का पीएम किसानचे पैसे?पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता नेमका कधी मिळणार?; याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, मागील तीन हप्त्यांच्या तारखा पाहिल्या असता, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळतील, अशी अपेक्षा आहे. याआधी दोन वेळा, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी २ हजार रुपये मिळाले आहेत. २०२४ मध्ये दिवाळीपूर्वी ५ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. २०२२ मध्ये, दिवाळीपूर्वी १७ ऑक्टोबर रोजी पैसे मिळाले होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.