Nanded News : नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेतून यंत्रसामग्री खरेदी करता यावी, यासाठी केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प राबविण्यात येते. .परंतु या योजनेतून नांदेड जिल्ह्याला आठ कोटी ४५ लाखांचे लक्षांक देण्यात आले. परंतु आजपर्यंत केवळ ७८ लाभार्थ्यांना ३० लाख ४८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. अनेक प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी स्तरावर पूर्वसंमतीविना रखडले आहेत..शेतकऱ्यांना यंत्रसामग्री खरेदी करता यावे यासाठी ४० ते ५० टक्के अनुदान वितरित करते. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना स्वयंचलित कृषी यंत्रे, ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर चलित औजारे खरेदी करता येते. तसेच, कृषी अवजारे बँक सुरू करून शेतकऱ्यांना भाड्याने यंत्रे उपलब्ध करून दिली जातात, ज्यामुळे मोठी गुंतवणूक न करता आधुनिक शेती करता येते. .Farm Mechanization : कृषी यांत्रिकीकरणाचे ४ कोटी ३ लाख रुपये जमा.या योजनेत केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (६० : ४० केंद्र : राज्य), राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण (१०० टक्के राज्य) व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प (६०:४० केंद्र : राज्य) या योजना राबविल्या जातात. या योजनेत मागील सहा वर्षांमधील खर्च विचारात घेऊन नांदेडला आठ कोटी ४५ लाखांचे लक्ष्यांक देण्यात आले. .याबाबत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पोर्टलवर ६५ हजार ५९४ अर्ज आले. यानंतर ऑनलाइन लॉटरी पद्धतीने ज्येष्ठताक्रम निश्चित करून ६२ हजार ४६९ अर्जदारांना कागदपत्र दाखल करण्याची सूचना दिली. परंतु यातील केवळ पाच हजार १५९ शेतकऱ्यांनी कागदपत्र दाखल केले. यातील १५९५ प्रकरणात कृषी सहायकांनी पडताळणी केली नाही. .Farm Mechanization : कृषी यांत्रिकीकरण योजनेत चालढकल करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा.पडताळणी झालेल्या ३५६४ प्रकरणांपैकी ३१९८ प्रस्तावांना पूर्वसंमती मिळाली आहे. तर ३६६ प्रस्तावांची तालुका कृषी अधिकारीस्तरावर पूर्वसंमती रखडली आहे. यातील ३८२ प्रस्तावात मोका तपासणी झाली नाही..दरम्यान, कृषी यांत्रिकीकरणात नांदेडला खर्च कमी असल्याने कृषी आयुक्तालयाकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून खुलासा मागविण्यात आला आहे. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून यांत्रिकीकरणात पेंडिंग प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे आदेशित केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.