Parbhani News : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यातील ८३३ गावातील ४ लाख ८३ हजार ६५३ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ३ लाख ५२ हजार ३८८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे..बाधित शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत आर्थिक मदत देण्यासाठी ३०२ कोटी १३ हजार ३ हजार ४५० रुपये निधी अपेक्षित आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. परभणी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ५२ मंडलात मुसळधार पाऊस झाला. अनेक मंडलात २ ते ४ वेळा अतिवृष्टी झाली. ओढे, नाल्या, नद्यांच्या पुराचे पाणी शेतामध्ये शिरले. गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमध्ये सोयाबीन, कपाशी, तूर,मूग,उडीद पिके कित्येक तास बुडाली..Crop Damage Survey : पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग.जमीन खरडून गेल्याने मातीचा सुपीक थर वाहून गेला. सप्टेंबर सर्वच मंडळतील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाकडून पीक नुकसानीचे बाधित शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र अंतिम करण्यात आले. त्यानुसार सर्व नऊ तालुक्यातील ३ लाख ५० हजार ४९४ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले..परभणी, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पूर्णा या ५ तालुक्यातील ९४.२० हेक्टरवरील बागायती पिके तसेच पालम वगळता इतर आठ तालुक्यातील १ हजार ८०० हेक्टरवरील फळपिकांचे ३३ टक्केवर नुकसान झाले आहे. .Rain Crop Damage : शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान.शेतकऱ्यांना २ हेक्टर मर्यादेत अर्थसाहाय्य देण्यासाठी जिरायती पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी ८ हजार ५०० रुपयेनुसार एकूण २७९ कोटी ९२ लाख ७०० रुपये, बागायती पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी १७ हजार रुपयेनुसार १६ लाख १ हजार ४०० रुपये, फळपिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी २२ हजार ५०० रुपयेनुसार ४ कोटी ५ लाख १ हजार ३५० रुपये असे जिरायती, बागायती, फळेपिके मिळून ३०२ कोटी १३ लाख ३ हजार ४५० रुपये निधी आवश्यक,असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले..९७ टक्केवर क्षेत्रावरील पिके बाधित....परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ५ लाख १५ हजार ३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.जून ते सप्टेंबर या कालावधीतील अतिवृष्टीमुळे ५ लाख ३ हजार ६१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.खरिपाच्या पेरणीपैकी ९७ .४१ टक्के क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.