Jejuri Dasara  Agrwoon
ॲग्रो विशेष

Jejuri Dasara : जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याची सांगता

Mardani Dasara : पालखी सोहळा, सनई-ढोलांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, विद्युत रोषणाई व खंडोबाचा जयघोष अशा उत्साही वातारणात कडेपठारच्या डोंगररांना जागविणाऱ्या येथील मर्दानी दसऱ्याची अठरा तासांनंतर खंडोबा गडावर सांगता झाली.

Team Agrowon

Pune News : जेजुरीतील कडेपठारच्या डोंगरात दसऱ्यानिमित्त देवभट सोहळा शनिवारी (ता. १२) मध्यरात्री पार पडला. पालखी सोहळा, सनई-ढोलांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, विद्युत रोषणाई व खंडोबाचा जयघोष अशा उत्साही वातारणात कडेपठारच्या डोंगररांना जागविणाऱ्या येथील मर्दानी दसऱ्याची अठरा तासांनंतर खंडोबा गडावर सांगता झाली. खंडा उचलण्याच्या स्पर्धेत तलवार तोलण्याच्या स्पर्धेत अंकुश गोडसे याने प्रथम तर करसरतीच्या प्रकारात शिवाजी राणे प्रथम क्रमांक मिळविला.

शनिवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता दसऱ्याच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. या वेळी मुख्य मानकरी इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, गणेश आगलावे, छबन कुदळे, संतोष खोमणे, सुधीर गोडसे, कृष्णा कुदळे, काशिनाथ मोरे, रोहिदास माळवदकर, रामदास माळवदकर, माऊली खोमणे, अनुप राऊत, दीपक राऊत, अविनाश सातभाई, दत्ता बारभाई आदी मानकरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शनिवारी सायंकाळी सहा वाजता पालखीचे प्रस्थान झाले. भंडारा उधळून व खंडोबाचा जयघोष करीत पालखी मार्गस्थ झाली. या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पालखी सुसरटिंगीवर आणण्यात आली. रात्री नऊ वाजता कडेपठारच्या पालखीचे प्रस्थान झाले. कडेपठारचे आपटापूजन साडेबारा वाजता झाले.

ॲग्रो विशेष

रमण्यातील देवभेटीचा सोहळा मघ्यरात्री एक ते दोनच्या सुमारास झाला. या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर अडीच वाजता रमण्यातील आपटापूजन झाले. कडेपठारची पालखी कडेपठारकडे मार्गस्थ झाली. तर गडावरची पालखी जुनी जेजुरी मार्गे जेजुरी गावात आली.

गावात फटाके वाजवून, रांगोळी व फुलांच्या पाकळ्यांची सजावट करीत पालखीचे स्वागत केले. पालखीपुढे घडशी समाजाच्या सुमारे शंभर बांधवांनी सनई व ढोल वादन केले. लावणी, पारंपरिक पदे, रागदारी, खंडोबाची पदे, नाट्य गिते, भावगिते, सनई व वाद्यातून सादर केली. लोककलावंतांनी गडावर पालखीसमोर हजेरी लावली. खंडोबाची गिते सादर केली.

तलवार स्पर्धेत गोडसे, राणे प्रथम

स्पर्धेतील विजेते (कंसात बक्षीस रक्कम व चषक) पुढीलप्रमाणे ः

खंडा तोलणे

प्रथम ः अंकुश गोडसे (३५०००), द्वितीय ः मंगेश चव्हाण (२५०००), तृतीय ः अमोल खोमणे (२००००)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Delay Impact: मॉन्सूनच्या पावसाअभावी उन्हाचा चटका तापदायक

Sesame Auction: सेलू उपबाजारात दर शनिवारी होणार तिळाचे लिलाव

Agri Department Tranfers Delay: आकृतिबंधाच्या आडून बदल्यांना खो; पात्रता, निकडीची कारणे असूनही कृषी विभागाकडून अडवणूक

Hormuz Strait Crisis: ‘हालचाली थांबवा, अन्यथा कारवाई’; इराणी नौदलाचा व्यापारी जहाजांना इशारा

Global Agriculture Trade: अन्नधान्य उत्पादन विक्रमी; पण पुरवठ्याची कासवगती, होर्मुझ तणावामुळे वाहतूक महागली

SCROLL FOR NEXT