Maharashtra Weather Update: प्रवाह मंदावल्याने राज्यात मॉन्सूनची अपेक्षित वाटचाल झालेली नाही. यातच पावसाअभावी उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. आज (ता. १५) कोकणात उष्ण व दमट हवामानाची, तर राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक प्रणालींचा अभाव दिसून येत असून, मोसमी वाऱ्यांची वाटचाल अडखळत सुरू आहे. हंगामी कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून ते पश्चिम बंगाल पर्यंत सक्रिय आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत, मध्य उत्तर प्रदेशापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे..रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश तापमानाची नोंद झाली. यवतमाळ येथे ४२ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक, वाशीम, वर्धा, मालेगाव येथे ४१ अंशांपेक्षा अधिक, तर जळगाव, अकोला, अमरावती, ब्रह्मपूरी, चंद्रपूर, गडचिरोली येथे ४० अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..El Nino: एल निनो सक्रिय; ‘आयएमडी’चा दुजोरा.विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, आज (ता. १५) कोकणात उष्ण व दमट हवामान तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात व उष्ण लाटेची शक्यता आहे. तसेच, पूर्व विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची आणि तुरळक विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे..मॉन्सूनची वाट पहावी लागणारनैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १२) पश्चिम बंगालसह बिहारच्या आणखी काही भागात प्रगती करत, ओडिशा आणि झारखंडमध्येही हजेरी लावली आहे. जवळपास आठवडाभरापासून अरबी समुद्रावरील मॉन्सूनची स्थिती जैसे थे आहे. त्याच्या महाराष्ट्रातील प्रगतीसाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालचा उर्वरित भाग, ओडिशा, बिहार, झारखंडचा आणखी काही भाग आणि दक्षिण छत्तीसगडच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..रविवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३६.३---२५.४अहिल्यानगर---३८.२---निरंकधुळे---४२.६---२४.०जळगाव---४०.६---२८.०जेऊर---३७.५---२१.०कोल्हापूर---३४.५--२४.७महाबळेश्वर---२५.०---१८.६मालेगाव---४१.०---२५.६नाशिक---३५.३---२४.९.Maharashtra Heatwave: राज्यात उष्ण लाटेचा इशारा.निफाड---३८.४---२५.०सांगली---३५.९---२४.२सातारा---३५.७---२४.२सोलापूर---३८.२---२६.१सांताक्रूझ---३५.१---२९.५डहाणू---३६.१---२८.४रत्नागिरी---३४.४---२९.२छत्रपती संभाजीनगर---३९.६---२६.२धाराशिव---३७.८---२३.०परभणी---३७.७---२८.६.परभणी (कृषी)---३६.५---२५.१अकोला---४०.१---३०.०अमरावती---४०.४---२३.९बुलडाणा---३९.०---२६.८ब्रह्मपुरी---४०.७---२४.१चंद्रपूर---४०.८---२६.२गडचिरोली---४०.०---२६.६गोंदिया---३७.४---२४.६नागपूर---३८.२---२३.४वर्धा---४१.५---२५.६वाशीम---४१.८---२३.२यवतमाळ---४२.४---२६.०.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२४.०---४२.६पश्चिम महाराष्ट्र---१८.६---३८.२मराठवाडा---२३.०---३९.६विदर्भ---२३.२---४२.४कोकण---२८.४---३६.१.उष्ण व दमट हवामान, उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वाशिम, वर्धा.वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :सांगली, सोलापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.उन्हाचा चटका कायम असलेली ठिकाणे :धुळे ४२.६, यवतमाळ ४२.४, वाशीम ४१.८, वर्धा ४१.५, मालेगाव ४१..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.