Agriculture Subsidy : सात लाख शेतकऱ्यांना २१०० कोटींचा लाभ

Agriculture Scheme : कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून तीन वर्षांत सात लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना २ हजार ११५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे.
Agriculture Subsidy
Agriculture Subsidy Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : जिल्ह्यात कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून तीन वर्षांत सात लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना २ हजार ११५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे. कांदा, सोयाबीन अनुदानासह शेती विकासासाठी असलेल्या योजनांचा यात समावेश असून पीकविम्यातून सर्वाधिक ११०० कोटींपेक्षा अधिक अनुदान मिळाले आहे.

शेती आणि शेतकरी विकासासाठी कृषी विभागामार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत. योजनांसाठी अनुदान दिले जाते. गेल्या दोन वर्षाचा विचार करता अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा अनुदान योजना २०२२-२३ अंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्यात आले. जिल्ह्यात ५५ हजार ३६८ लाभार्थी असून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे रुपये ११५ कोटी ९६ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले.

Agriculture Subsidy
Agriculture Irrigation Subsidy : बुलडाणा जिल्ह्यात ठिबक, ‘तुषार’चे ७२ कोटी थकले

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या १ लाख ५०० शेतकऱ्यांना बँकांकडून घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये ५० हजार या कमाल मर्यादेत रुपये ३६२ कोटी २३ लाख एवढा प्रोत्साहनपर लाभ मिळाला आहे. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांत ७३२ शेतकऱ्यांना १४ कोटी ७ लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली.

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान अंतर्गत ३०८ शेतकऱ्यांना ६ कोटी ६ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजनांवर गेल्या तीन वर्षात २६ कोटी ५४ लाख ४४ हजार रुपये खर्च करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत गेल्या ३ वर्षांत जिल्ह्यातील १८ हजार ६३३ शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी १०८ कोटी ५३ लक्ष ५० हजार रुपयांचे अनुदान वितरित.

पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांत ९८७ प्रकल्पांना ३८ कोटी ८९ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान वितरित. राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ३६ हजार ५४ लाभार्थ्यांना ८७ कोटी २ लाख ९१ हजार ५७ रुपयांचे अनुदान वितरित. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील एकूण ४० हजार ९४० लाभार्थ्यांना ४९ कोटी १३ लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

Agriculture Subsidy
Agriculture Subsidy : रब्बी प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार

अटल भूजल योजनेंतगत जिल्ह्यातील एकूण १ हजार ७८३ लाभार्थ्यांना २ कोटी ४८ लाख ४५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. फळपिके, फुलपिके, भाजीपाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड, प्रक्रिया व निर्यात क्षेत्रातील वाव लक्षात घेऊन राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाद्वारे ३ हजार ७०७ लाभार्थ्यांना ३४ कोटी ६१ लाख ७८ हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले. तर, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तीन वर्षांत ५ हजार १५६ शेतकऱ्यांना ४७ कोटी ९३ लाख रुपयांचा अनुदानाचा लाभ झाला.

विमा योजनेतून सर्वाधिक रक्कम

पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये खरीप व रब्बी हंगामात गेल्या तीन वर्षांत अहिल्यानगर जिल्ह्यात ५ लाख १३ हजार ३७ शेतकऱ्यांना ११६५ कोटी ४७ लाख ९२ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. पंतप्रधान फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ३७ हजार ७१ शेतकऱ्यांना ६२ कोटी ४५ लाख २१ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com