Akshay Shinde Encounter Agrowon
ॲग्रो विशेष

Badlapur Encounter Case : ‘आरएसएसच्या लोकांना वाचविण्यासाठी एन्काउंटर’

Vijay Wadettiwar : म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आले असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

Team Agrowon

Mumbai News : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी होती. मात्र भाजपने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला आहे. म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आले असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

अक्षय शिंदे शाळेच्या ट्रस्टींचे कारनामे उघड करू शकला असता, त्याआधीच त्याला संपवण्यात आले आहे. त्यामुळे एन्काउंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदे याला अटक केली होती. त्याला तपासासाठी नेत असताना पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला होता. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, की माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात सहा महिन्यांत ६८३९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का हा प्रश्न पडतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT