Vijay Wadettiwar : इव्हेंट झाले असतील तर आता शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, विजय वडेट्टीवार यांचा मराठवाड्यातील पुरावरून सरकारवर निशाना

Heavy rains in Marathwada : मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्याने शेतातील उभे पिक वाहून गेलं आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarAgrowon
Published on
Updated on

Pune News : मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्याने खरीप हंगामही वाया गेला आहे. यावरून राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी (ता.३) सरकारवर टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी सरकारचा इव्हेंट झाला असतेल तर शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, असा टोला लगावला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विविध भागात मुसळधार पावसानं दाणादाण उडवून दिली. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती ओढावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे. प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिएकरी २५ हजार रुपये द्या ; विजय वड्डेटीवर यांची मागणी

यावरून वडेट्टीवार यांनी, मराठवाड्यातील हिंगोली, परभणी जालना आणि नांदेडच्या काही भागात मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे उघड झाले आहे. यावरून सोमवारीच मुंख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना पत्र पाठवले आहे. तसेच तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची, मागणी केल्याचे म्हटले आहे.

सरकारने संयुक्त पंचनामे करून कापसाला हेक्टरी ५०,००० आणि सोयाबीन पिकाला हेक्टरी २५,००० मदत द्यावी. आता महायुती सरकारने वेळेचं गांभीर्य बघून इव्हेंट थांबवावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी. आता शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्याला जगवण्यासाठी, वाचवण्यासाठी सरकारने मदत करायला हवी, असेही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : कापूस, कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकरीच सरकारची मस्ती उतरवतील : वडेट्टीवार

सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता घेऊ नये. जिथे सत्ताधारी सरकारी जमिनी विकून मंत्र्यांच्या आणि बिल्डरांच्या घश्यात कवडीमोलाने घालत आहेत. तिथे शेतकऱ्यांसाठी सरकारने तिजोरीकडे बघू नये, नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारी जमिनी हव्या तर विका आणि मदत करा असे आवाहन वडेट्टीवार केलं आहे.

याआधी देखील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाली आहेत. पण अद्याप मदत मिळालेली नाही. ती केव्हा मिळणार असाही सवाल वडेट्टीवार यानी सरकारला केला आहे. सरकार फक्त घोषणा करत आहे. कृषिमंत्र्यांनीही काल कापूस आणि सोयाबिनच्या बाबतीत घोषणा केली. पण पैसे देण्यासाठी तिजोरीत पैसे कोठे आहेत? शेतकऱ्याला पैसै द्यायला सरकारच्या तिजोरीतच पैसै नाहीत, असा आरोप करताना सरकारने शेतकऱ्यांना मुर्ख बनवू नका, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मदत करावी अशीही मागणी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com