Nagpur News : पोकरा-२ प्रकल्पात २१ जिल्ह्यांतील तब्बल ७१९८ गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. या गावातील सरपंचाच्या माध्यमातून पूरक तंत्रज्ञानाचा आराखडा तयार करून घेतला जात असून त्याकरिता सरपंचांना प्रशिक्षित केले जात आहे. सुमारे साडेचार हजारांवर सरपंचांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर यांनी दिली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) दोनची अंमलबजावणी जागतिक बॅंकेच्या निधीतून केली जात आहे. गावस्तरावर प्रकल्प राबविताना सरपंचांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्यापार्श्वभूमीवर या सरपंचांना प्रशिक्षण दिले जात आहे. यशदामार्फत त्याकरिता विशेष प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात आला आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यांतील ४२८४, मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातील १९२१, खानदेशमधील दोन जिल्ह्यांतील ९९३ अशा एकूण ७१९८ गावे समाविष्ट आहेत. प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम कृषी विकास समिती गठीत केली आहे.
या समितीचे सरपंच अध्यक्ष तर कृषी सहाय्यक सहसचिव, ग्रामविकास अधिकारी सदस्य सचिव, सदस्यांमध्ये उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तीन प्रगतिशील शेतकरी, एक विविध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष, एक शेतकरी उत्पादक कंपनी अथवा शेतकरी गट प्रतिनिधी, एक महिला स्वयंसहाय्यता समूह प्रतिनिधी, दोन कृषिपूरक व्यावसायिक शेतकरी, तलाठी यांचा समावेश आहे.
अशा आहेत गाव विकास समितीच्या जबाबदाऱ्या
गाव अनुकूल प्रकल्प आराखडा तयार करणे, शेतकऱ्यांच्या गरजेनुसार राबविण्याच्या बाबी, मृद व जलसंधारण कामे, शेतकऱ्यांना संबंधित घटकाचे निकष समजावून सांगणे, घटकास मंजुरी मिळाल्यानंतर निकषानुसार काम करून घेणे, पात्र शेतकऱ्यांना समूह स्वरूपात वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच मंजू केलेले काम समूह स्वरूपात करण्यासाठी मदत करणे, सामाईक जमिनीवर मृद्संधारण, प्रकल्पाअंतर्गंत चालू असलेल्या व पूर्ण करण्यात आलेल्या सर्व बाबींचे सामाजिक लेखा परीक्षण करणे, ग्राम कृषी विकास समितीने ग्रामपंचायत स्तावर प्राप्त तक्रारींचे मासिक बैठकीत निराकरण करणे अशा प्रकारच्या या समितीच्या जबाबदाऱ्या आहेत.
जिल्हानिहाय गावसंख्या
अकोला १४९, अमरावती ४५४, भंडारा २९१, बुलडाणा ३१०, चंद्रपूर ५६१, गडचिरोली ५३२, गोंदिया २९३, नागपूर ५६३, वर्धा ३८३, वाशीम १८९, यवतमाळ ५५९, बीड ३९८, छत्रपती संभाजी नगर २९६, धाराशिव १३८, हिंगोली १४८, जालना १७७, नांदेड ३७५, परभणी १७३, जळगाव ३१९, नाशिक ६७४ याप्रमाणे ७१९८ गावांचा समावेश केला आहे.
पोकरा-२ प्रकल्पात सरपंचांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळेच त्यांना प्रशिक्षणातून त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे. गावाचा आराखडा त्यांच्या माध्यमातून तयार होईल.- विजय कोळेकर, कृषी विद्यावेत्ता, पोकरा प्रकल्प
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.