
Nanded News : जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरपंचासह कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रकल्पाचा समावेश झालेल्या ३३३ पैकी २२० गावांत ग्राम कृषी विकास समिती स्थापन झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.
नांदेड जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) ६७५ गावांत राबविण्यात येणार आहे. यात निवड झालेल्या गावात ३३३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या गावात ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात येत आहेत. आजपर्यंत ३३३ पैकी २२० गावात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
तर ११३ गावात अद्याप समित्या स्थापन करण्याचे काम बाकी आहे. यासोबतच प्रकल्पात समावेश असलेल्या गावातील सरपंचाचे पहिले प्रशिक्षण नुकतेच झाले. यात २३३ सरपंचांना प्रशिक्षण देण्यात आले. उर्वरित १०० सरपंचांना प्रशिक्षण देण्याचे काम बाकी आहे. यात महिला सरपंच असलेल्या गावांचा समावेश आहे.
दरम्यान सरपंचासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. आत्माच्या प्रकल्प उपसंचालक अर्चना गुंजकर, उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, उमरी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, डॉ. अमरज्योती गचे यांना प्रकल्प परिचय प्रशिक्षण देण्यात आले.
पोकरा प्रकल्पातर्गत गावात यावेळी चार स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार आहे. या स्वयंसेवकांकडून प्रकल्पाचा सूक्ष्म आराखडा तयार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सध्या प्रकल्प विशेषज्ञ (कृषी) श्रीमती पुनम चातरमल या एकमेव अधिकारी कार्यरत आहेत. इतर पाच कंत्राटी कर्मचारी लवकरच भरती होण्याची शक्यता आहे.
...अशी असले ग्राम कृषी विकास समिती
पदसिद्ध अध्यक्ष - सरपंच, पदसिद्ध सदस्य - उपसरपंच, सदस्य - ग्रामपंचायत सदस्य (एक), प्रगतिशील शेतकरी - तीन (यात एक महिला), विविध कार्यकारी सहकारी संस्था - एक सदस्य, शेतकरी उत्पादक कंपनी/गट - एक सदस्य, महिला बचत गट एक सदस्य, कृषी पूरक व्यावसायिक शेतकरी - दोन, यासह ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी अशा १४ सदस्यांचा समावेश असणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.