Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील तीन दिवसांत ५७३ ट्रक कांदा आला आहे. बुधवारी १८९ ट्रक लाल तर आठ गाड्या पांढरा कांदा विक्रीसाठी आला होता. गतवर्षीच्या तुलनेत आवक खूप कमी असताना देखील भाव वाढलेले नाहीत. सध्या कांद्याला सोलापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल अकराशे रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळत आहे..मागील तीन वर्षांत ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे १५ हजार गाड्या कांदा विक्रीसाठी आल्याचे पाहायला मिळाले. पण, यंदाच्या अतिवृष्टी व पुरामुळे सोलापूर बाजार समितीतील कांद्याची आवक घटली आहे. सरासरी भाव देखील मागील सहा महिन्यांपासून दीड हजारांवर गेलेला नाही. .Onion Farmers: शिरूर तालुक्यात कांदा रोपे धोक्यात.सोलापूर, बीड, धाराशिव, पुणे, नाशिक या जिल्ह्यातील कांद्याचे हजारो हेक्टर क्षेत्र अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कांदा अजूनही अपेक्षेप्रमाणे बाजार समितीत आलेला नाही. सांगली, कर्नाटक, बीड येथून कांदा येऊ लागल्याचे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले..Onion Subsidy: फेरछाननीनंतर पात्र कांदा उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षाच.सध्या सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला किमान १०० रुपये आणि जास्तीत जास्त २२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. सरासरी भाव १०५० रुपयांपर्यंत आहे. दुसरीकडे पांढऱ्या कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये ते ३२०० रुपयांपर्यंत भाव आहे. .दोन दिवसांपूर्वी पांढऱ्या कांद्याला सरासरी १७०० रुपये भाव होता, तो आता दोनशे रुपयांनी कमी झाला आहे. तर लाल कांद्याचा सरासरी भाव देखील १०० रुपयांनी उतरला आहे.तीन दिवसांतील कांदा अन् भावदिवस आवक (ट्रक) सरासरी भावसोमवार २२३ १२००मंगळवार १५३ ११००बुधवार १९७ १०५०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.