POCRA 2.0 : सरपंच, कृषी विकास समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची

Rural Development : यशदा पुणे आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे घेण्यात आलेल्या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षणमध्ये उपस्थित सरपंच यांना श्री. देशमुख मार्गदर्शन करीत होते.
POCRA 2.0
POCRAAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ या योजनेत गाव विकास आणि प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्राम कृषी विकास समितीचे अध्यक्ष म्हणून गाव स्तरावर सरपंचाची भूमिका व कृषी समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची, असल्याचे प्रतिपादन जिल्हा कृषी अधिकारी पी. आर. देशमुख यांनी केले.

यशदा पुणे आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे घेण्यात आलेल्या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षणमध्ये उपस्थित सरपंच यांना श्री. देशमुख मार्गदर्शन करीत होते. गंगापूर तालुक्यातील सरपंच यांचे प्रकल्प परिचय प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २९६ सरपंच यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशदाचे महासंचालक डॉ. एन. के. सुधांशू, उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी संजीवनी प्रकल्पचे संचालक परिमल सिंह, मराठवाडा विभागाचे सत्र संचालक शरदचंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे.

POCRA 2.0
POCRA Project : ‘पोकरा’च्या कामात सरपंचांची भूमिका महत्त्वाची

सरपंच यांना दोनदिवसीय प्रशिक्षणादरम्यान नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा- २ (पोकरा) प्रकल्प काय आहे. प्रकल्पाचा परिचय, ग्राम कृषी विकास समितीची स्थापना समितीचे कार्य व जबाबदाऱ्या, कृषीताई यांची निवड, लोक सहभागीय सूक्ष्म नियोजन, त्याकरिता ग्रामस्तरावर स्वयंसेवकांची निवड, गावाचा पाण्याचा ताळेबंद मृद्‍ व जल संधारण आणि भूजल पुनर्भरण पाण्याचा कार्यक्षम वापर, खरीप व रब्बी हंगाम नियोजन, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, हवामान अनुकूल तंत्रज्ञान कृषिपूरक व्यवसाय फळबाग व बांबू लागवड,

POCRA 2.0
POCRA 2.0 : ‘पोकरा २.०’ अंतर्गत समाविष्ट गावांच्या सरपंचांना प्रशिक्षण

शेती शाळेद्वारे हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रचार व पसार कृषिपूरक व्यवसाय उभारणे, ग्रामस्तरावर काढणी पश्चात व मूल्य साखळीचे बळकटीकरण, पर्यावरण सुरक्षितता मृद्‍ व जलसंधारण कामासाठी ई-निविदा प्रक्रिया, थेट लाभ हस्तांतरण पद्धत. क्षमता बांधणी प्रशिक्षण अभ्यास दौरे व प्रशिक्षण कार्याशाळा प्रकल्पाच्या माहिती व तंत्रज्ञान कार्यप्रणालीची ओळख शून्य मशागत यावर आदर्श व प्रगत शेतकरी दीपक जोशी यांनी विशेष मार्गदर्शन केले.

पाणी फाउंडेशन मार्फत लोकसहभाग यांचा महत्त्व इत्यादी विषयावर मार्गदर्शन, कृषी विभागाचे गोविंद पौळ यशदाचे प्रवीण प्रशिक्षक, भारती खरटमल, मानाजी पवार, आदर्श गाव पाटोदा सरपंच जयश्री दिवेकर, ऋतुजा जाधव, विजय सावंत, सतीश वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाला, उपविभागीय अधिकारी एस. बी. आघाव यांनी प्रासंगिक मार्गदर्शन केले. तर मान्यवरांचावरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com