Dharashiv News : जिल्ह्यात बुधवारी (ता. २९) पहाटेपासून दिवसभर सर्व आठही तालुक्यांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसह पेरण्यांची कामे खोळंबली. भारी जमिनी चिभडल्याने पूर्वमशागतीसह पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बीचे नियोजन विस्कळित झाले आहे. मे महिन्यापासून ते ऑक्टोबर महिना संपत आला असून, सहा महिने झाले तरी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याची स्थिती आहे. .जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपर्यंत कोरडे हवामान राहिल्यानंतर बुधवारी पहाटे अचानक पावसाची रिपरिप सुरू झाली. पावसाचा जोर अधून-मधून कमी अधिक होत राहिला. हा पाऊस सकाळपर्यंत सुरू राहिला. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभरात देखील अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी येत राहिल्या. त्यामुळे शेतीकामे पूर्णपणे खोळंबल्याची स्थिती राहिली. .Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला.वाशी तालुक्यात सर्वदूर हलका पाऊस झाला; तर तुळजापूर तालुक्यातही हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. भूम तालुक्यात पावसामुळे शेतीकामांना फटका बसला. परंडा आणि कळंब तालुक्यातही पावसाने रब्बीच्या कामांवर परिणाम झाला. उमरगा, लोहारा तालुक्यांत हलका पाऊस झाला. धाराशिव तालुक्यासह शहरात पहाटेपासून पाऊस बरसत राहिला. सकाळी अकराच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा वाढला. त्यानंतर दुपारी पावसाने विश्रांती घेतली..Unseasonal Rain: मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा! ५ जिल्ह्यांतील ४० मंडळांत अतिवृष्टी.पेरण्या खोळंबल्या, हंगाम लांबणारजिल्ह्यात यंदा जादा पाऊस झाल्यामुळे सर्व जमिनी अजून वाफशाला आलेल्या नाहीत. जमिनी वाफशाला येईल त्याप्रमाणे पूर्व मशागत करून शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरवात केलेली आहे. जिल्ह्यात अजून २० टक्केही पेरण्या उरकलेल्या नाहीत. त्यात पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पेरण्यांना आणखी विलंब होणार आहे..पावसामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रातील उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत असून, अधिक पाऊस पडल्यास दुबार पेरणी करावी लागू शकते, असेही ते सांगत आहेत. रब्बी पेरण्या नोव्हेंबर अखेरपर्यंत चालतील, अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे रब्बी पिकांचा काढणी कालावधी पुढे एप्रिलपर्यंत लांबण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.