भारतातून तांदळाच्या निर्यातीत १० टक्क्यांहून अधिक वाढीची शक्यता२०२४-२५ आर्थिक वर्षात २.१ कोटी टन तांदळाची निर्यातही निर्यात १७२ हून अधिक देशांमध्ये करण्यात आली.India Rice Exports: जगातून चांगली मागणी असल्याने या आर्थिक वर्षात भारतातून होणाऱ्या तांदळाच्या निर्यातीत १० टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे, असे कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे (APEDA) अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितले..२०२४-२५ आर्थिक वर्षात देशातून १२.९५ अब्ज डॉलर्सची २.१ कोटी टन तांदळाची निर्यात झाली. ही निर्यात १७२ हून अधिक देशांमध्ये करण्यात आली. अपेडा ही वाणिज्य मंत्रालयाची एक शाखा असून, जी देशाच्या कृषी निर्यातीशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक करते.."या आर्थिक वर्षात तांदूळ निर्यात वाढेल. आम्हाला प्रमाणाच्या दृष्टीने वाढ अपेक्षित आहे. तांदूळ निर्यातीतून उलाढालही वाढेल," असा विश्वास देव यांनी व्यक्त केला आहे. ते भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद (BIRC) २०२५ दरम्यान बोलत होते. त्यांनी तांदळाचे विविध वाण तसेच तांदळापासून बनविलेल्या विविध उत्पादनांची निर्यात वाढवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. .India Rice Exports: भारताची २६ देशांत तांदूळ निर्यातीची तयारी, २५ हजार कोटींचे करार शक्य, काय आहे योजना?.सरकारने अशा २६ देशांवर लक्ष केंद्रित केले आहे; जे सध्या भारतातून खूप कमी प्रमाणात तांदूळ खरेदी करतात. फिलीपिन्ससह २६ देशांमध्ये निर्यातीसाठी मोठी संधी आहे. भारतीय तांदूळ निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही २६ देशांमध्ये एक शिष्टमंडळ पाठवत आहोत, असेही त्यांनी सांगितले..Rice Pest Control: भातावरील गंधी ढेकूण, तपकिरी तुडतुडे आणि लष्करी अळीचे नियंत्रण.सप्टेंबरमध्ये तांदळाच्या निर्यातीत ३३.१८ टक्क्यांनी वाढ होऊन ती ९२५ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली. एप्रिल-सप्टेंबरदरम्यान निर्यातीत १० टक्क्यांची वाढ झाली होती. यातून ५.६३ अब्ज डॉलर्सची उलाढाल झाली. .भारत हा जगातील सर्वात मोठा भात उत्पादक देश आहे. भारतातून सुमारे १७२ देशांना तांदूळ निर्यात केला जाते. देशात २०२४-२५ मध्ये सुमारे ४७ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर सुमारे १५० दशलक्ष टन भाताचे उत्पादन घेण्यात आले. हे जगातील उत्पादनाच्या सुमारे २८ टक्के आहे. .संकरित बियाणे वाण, चांगल्या कृषी पद्धती आणि सिंचन सुविधांमुळे सरासरी उत्पादन २०१४-१५ मधील प्रतिहेक्टर २.७२ टनांवरून २०२४-२५ मध्ये सुमारे ३.२ टनांवर पोहोचले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.