Sustainable Development  Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Development : गरजा कमी केल्या तरच नैसर्गिक घटकांचे संवर्धन

Forest Conservation : जल, जमीन, जंगल, पशुधन, जन हे शाश्वत विकासाचे केंद्रबिंदू आहेत. मानवी गरजा कमी केल्या तरच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे शक्य होईल.

Team Agrowon

Parbhani News : जल, जमीन, जंगल, पशुधन, जन हे शाश्वत विकासाचे केंद्रबिंदू आहेत. मानवी गरजा कमी केल्या तरच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे शक्य होईल. त्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन पद्मश्री चैत्राम पवार यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, जनकल्याण सेवा संस्था यांच्यातर्फे पद्मश्री चैत्राम पवार यांची प्रकट मुलाखत व नागरी सत्कार बुधवारी (ता.९) आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कुलगुरू डॉ.इंद्र मणी अध्यस्थानी होते. शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार, कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख, हरिश कुलकर्णी, संदीप देशमुख, परभणी अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉ.रामेश्वर नाईक, डॉ. पी. आर. पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ.जगदीश नाईक आणि डॉ.विजयकिरण नरवाडे यांनी पद्मश्री चैत्राम पवार यांची मुलाखत घेतली. चैत्राम पवार म्हणाले, की गावांनी संघटीत होऊन काम केल्यास वनांचे संवर्धन होईल. स्थलांतरामुळे गावे विस्कळीत होत आहेत. गावांच्या शाश्वत विकासासाठी जल, जमीन, जंगल, पशुधनाचे संरक्षण होणे गरजेचे आहे. बारिपाडा येथे १९९२ मध्ये बचत गट स्थापन करुन सर्वांना एकत्रित आणले.

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. त्याद्वारे रोजगार निर्मिती झाली. शेतीमध्ये मिरची, स्ट्रॉबेरी, बटाटा आदी पिकांच्या लागवडीचे प्रयोग केले. सेंद्रिय पध्ततीने इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेतले.रानभाज्या महोत्सव सुरु केले.मोहा पासून तेल, साबण, व्हॅसलिन, मोह फुलांचे मनुके तयार करुन विक्री केली.मोहाचे एक झाड १ लाख रुपये उत्पन्न देऊ शकते.

वनसंवर्धन हि काळाची गरज आहे. कृषी वानिकीय शेती पद्धतीतून उत्पन्न मिळाले पाहिजे. आदिवासी व्यक्ती विचाराने श्रीमंत आहेत.त्यांच्या गरजा कमी आहेत. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी दृष्टीकोनात बदल हवा.छोट्या छोट्या गावांचा विकास करुन भारत देश स्वालंबी करण्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील. युवकांना पुढाकार घ्यावा लागेल असे पवार यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT