New Delhi News: जीएसटी सुधारणा आणि सणासुदीच्या काळामुळे बाजारातील मागणी वाढली आहे. महागाई नियंत्रणात असून खाद्यपदार्थांचे दर कमी झाल्याने सप्टेंबरमधील चलनवाढ १.५४ टक्के अशी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे वैश्विक व्यापारातही भारताची आर्थिक कामगिरी स्थिर असून विद्यमान आर्थिक वर्षाच्या (२०२५-२६) पहिल्या सहामाहीत निर्यात ४१३.३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. .अर्थमंत्रालयाने सप्टेंबर महिन्यातील आर्थिक घडामोडींचा आढावा आज जाहीर केला. त्यानुसार अलीकडेच जाहीर झालेल्या जीएसटी सुधारणा आणि सणासुदीचा काळ यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील मागणी वाढल्याचे या अहवालात नमूद केले आहे. त्यासाठी वाहन उद्योगासारख्या क्षेत्रांमध्ये विक्रीवृद्धीचे अहवाल अहवाल त्याचप्रमाणे उत्पादन आणि सेवा क्षेत्रांमध्येही मजबूत वाढ याकडे मासिक अहवालात अर्थमंत्रालयाने लक्ष वेधले आहे..Inflation Rate: महागाई दरघटीचा बळी शेतकरीच.अर्थमंत्रालयाने म्हटले आहे, की विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झालेली वाढ तसेच दुसऱ्या तिमाहीतील सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारतीय जीडीपीच्या (देशांतर्गत ढोबळ उत्पन्न) वृद्धिदरात सुधारणा केली. ‘आयएमएफ’ने भारतीय विकासदराचा अंदाज ६.६ टक्के राहील असे म्हटले आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या अंदाजानुसार हा दर ६.८ टक्के राहण्याची शक्यता आहे..GST Reforms : ‘जीएसटी’ सुधारणांचा जनतेला दिलासा.सप्टेंबरच्या घडामोडींच्या आधारे अर्थमंत्रालयाने दावा केला आहे, की चलनवाढ नियंत्रित राहिली असून, अन्नपदार्थांच्या किमतींतील घसरणीमुळे ती आणखी खाली आली आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ चलनवाढ १.५४ टक्क्यांवर आली, तर विद्यमान आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण किरकोळ चलनवाढीचा दर १.७ टक्के नोंदवला गेला. अन्नधान्य आणि इंधनविरहित वस्तूंच्या किमती स्थिर राहिल्या असून, हा दर सप्टेंबरमध्ये ४.६ टक्के होता. हवामानातील प्रतिकूल बदल किंवा पुरवठा साखळीतील अडथळे नसल्यास किंमत स्थिर राहण्याची शक्यता आहे..सेवा निर्यातीत वाढपहिल्या सहामाहीत भारताच्या एकूण निर्यातीमध्ये (वस्तू व सेवा मिळून) ४.४ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली असून ती ४१३.३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. वस्तूंची निर्यात तीन टक्क्यांनी तर सेवा निर्यात ६.१ टक्क्यांनी वाढली आहे. या काळात कोअर मर्चेंडाइज निर्यातीमध्येही ७.५ टक्क्यांची मजबूत वाढ झाली. अर्थमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मिती भर दिला असल्याने पहिल्या सहामाहीत उद्योग आणि सेवा क्षेत्रांमध्ये रोजगारवाढ झाली आहे, याबरोबरच जीएसटीमधील सुधारणांच्या अंमलबजावणीमुळे विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वृद्धीला तसेच पर्यायाने रोजगारनिर्मितीला चालना मिळेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.