Sunil Mendhe  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Rotation : धानपट्ट्यात पीक फेरपालटावर भर द्या

MP Sunil Mendhe : एकच पीक सातत्याने घेतल्यास जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नैसर्गिक शेतीचा अंगीकार करीत पीक पद्धतीत बदलाचे धोरण शेतकरीस्तरावर असावे, अशी अपेक्षा खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्‍त केली.

Team Agrowon

Bhandara News : एकच पीक सातत्याने घेतल्यास जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नैसर्गिक शेतीचा अंगीकार करीत पीक पद्धतीत बदलाचे धोरण शेतकरीस्तरावर असावे, अशी अपेक्षा खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्‍त केली.

केव्हीके साकोलीच्या वतीने आयोजित नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार मेंढे म्हणाले, रासायनिक घटकांचा सातत्याने आणि वारेमाप वापर करण्यात आल्याने जमिनीचा कर्ब कमी होत आहे.

परिणामी अन्नघटकांचा दर्जाही त्यानुसार खालावत असल्याचे निष्कर्ष आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर नैसर्गिक शेती पद्धती फायदेशीर ठरत असल्याने त्यानुसार व्यवस्थापन पद्धतीत बदल करावा. यातून जमिनीचा पोत सुधारण्यासोबतच उत्पादकता खर्चातही बचत होईल.

सोबतच पीक पद्धतीत बदलाचे रोटेशन असले पहिजे,’’ असा सल्लाही त्यांनी दिला. धानाची लागवड करावयाची असल्यास केव्हीकेच्या वतीने विकसित नव्या वाणाचा अवलंब करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

शेतीचा विचार हा लाँगटर्म गुंतवणुकीसारखा केला पाहिजे. त्याआधारे शेतीमध्ये काय बदल करता येईल याचे आराखडे तयार करावे. सध्या रासायनिक खतांना विविध पर्याय केंद्र सरकारस्तरावर उपलब्ध आहेत. त्यातील लिक्‍वीड युरियाचा वापर वाढवावा, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT