Grape Festival : महाशिवरात्रीनिमित्त सांगलीत गुरुवारपासून द्राक्ष महोत्सव

Nashik Grape Festival : प्रयोगशील आणि प्रगगिशील द्राक्ष शेतकऱ्यांनी, पिकवलेल्या द्राक्षांचे प्रदर्शन द्राक्ष महोत्सवाच्या निमित्ताने भरवले जावे, तसेच द्राक्ष फळासंबंधी ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी सांगलीत महाशिवरात्री निमित्ताने गुरुवारी (ता. ७), शुक्रवारी (ता. ८) द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Grape Festival Nashik
Grape Festival NashikAgrowon

Sangli News : सांगली ‘द्राक्ष पीक प्रधान’ जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याने संपूर्ण देशात द्राक्ष उत्पादनात चांगल्या दर्जाचे नाव कमावले आहे. प्रयोगशील आणि प्रगगिशील द्राक्ष शेतकऱ्यांनी, पिकवलेल्या द्राक्षांचे प्रदर्शन द्राक्ष महोत्सवाच्या निमित्ताने भरवले जावे, तसेच द्राक्ष फळासंबंधी ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी सांगलीत महाशिवरात्री निमित्ताने गुरुवारी (ता. ७), शुक्रवारी (ता. ८) द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कृषी विभाग, द्राक्ष संघ, कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या, बेदाणा व्यापारी असोशिएशन व बाजार समितीच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाने दिली. या संदर्भात कृषी विभागात बैठक झाली.

Grape Festival Nashik
Grape Harvest Festival : ‘ग्रेप हार्वेस्ट’ला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद

जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सुरेंद्र पाटील, द्राक्ष संघाचे सचिव तुकाराम शेळके आणि संचालक, बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे व संचालक आणि कृषी निविष्ठा उद्योजक संजीव कोल्हार, दीपक राजमाने, प्रतीक शहा, रवींद्र मुडे, समीर इनामदार, अविनाश माळी, सदाशिव लांडगे, यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Grape Festival Nashik
Mahasanskruti Festival : महासंस्कृती महोत्सवाकडे पहिल्या दिवशी ग्राहकांची पाठ

द्राक्ष खाल्ल्याने होणारे आरोग्यासाठीचे फायदे यासंबंधी लोकांमध्ये माहिती पोहोचावी यासाठी राममंदिर चौकातील कच्छी भवनात द्राक्ष महोत्सव होईल. द्राक्ष महोत्सवाच्या निमित्ताने ‘महाशिवरात्र द्राक्ष दिन’ म्हणून देशभरात दरवर्षी साजरा व्हावा आणि या दिवशी प्रत्येक घरोघरी आवडीने द्राक्षे आणि बेदाणे खाल्ले जावेत. ज्यामुळे द्राक्ष फळांची मागणी वाढून दरामध्ये वाढ व्हावी व शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा हा द्राक्ष महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. महाशिवरात्रीला द्राक्षे खाल्ली जावीत हा संदेश देशभर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.

मागणी देशभरात वाढेल

‘महाशिवरात्र’ द्राक्ष दिन संपूर्ण भारतभर भविष्यात साजरी झाली, तर द्राक्ष आणि बेदाणा फळाची मागणी सर्व देशभर वाढेल, यामुळे द्राक्ष बागायतदारांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल व त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व कृषी संलग्न व्यवसायांना भरभराटीचे दिवस येतील हा उद्देश ठेवून सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या संख्येने ग्राहकांसमवेत ‘द्राक्ष महोत्सव’ साजरा करूया यासाठी सर्वांच्या उपस्थितीची व सहकार्याची आवश्‍यकता आहे, असे आवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com