Cashew Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Orchard : काजू बागेत स्वच्छतेसह मशागतीच्या कामांवर भर

Cashew Production : हेत (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे मनोहर शिवराम फोंडके यांची ५ एकर शेतजमीन आहे. त्यातील सुमारे अडीच एकरमध्ये ३०० काजू लागवड केली आहे.

एकनाथ पवार

Cashew Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : काजू

शेतकरी : मनोहर शिवराम फोंडके

गाव : हेत, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

एकूण क्षेत्र : ५ एकर

काजू लागवड : अडीच एकर

हेत (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे मनोहर शिवराम फोंडके यांची ५ एकर शेतजमीन आहे. त्यातील सुमारे अडीच एकरमध्ये ३०० काजू लागवड केली आहे. यात प्रामुख्याने वेंगुर्ला चार, वेंगुर्ला सात जातीची झाडे आहेत. काजू लागवडीमध्ये रासायनिक खते आणि सेंद्रिय खतांचे योग्य नियोजन केले जाते. त्यामुळे झाडांची वाढ चांगली होण्यास मदत होते. तसेच तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर केला जात नाही. त्याऐवजी ग्रासकटरच्या साह्याने बागेतील सर्व तण कापले जाते. कापलेले तण बागेमध्येच टाकले जाते. त्याचा झाडांना फायदा होतो.

सध्या यंदाचा हंगाम संपुष्टात आला आहे. सध्या बागेतील पालापाचोळा गोळा करून बागेच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पुढील आठवड्यापासून पावसास सुरुवात होईल. याकाळात बागेत मशागतीच्या कामे करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यानंतर खतांच्या मात्रा झाडांना दिल्या जातील.

मागील हंगामातील कामकाज

या वर्षी काजू बागेतील झाडांना पालवी उशिराने आली. त्यामुळे सर्व रासायनिक फवारण्यांचे नियोजन कोलमडले. परिणाम पुढील रासायनिक फवारण्या काहीशा विलंबाने कराव्या लागल्या.

उन्हाळ्याच्या दिवसांत वणवा लागण्याची शक्यता असते. नोव्हेंबर महिन्यात बागेभोवतीच्या माळरानावरील गवत पूर्णपणे वाळून जाते. या गवतामुळे बागेत वणवा येण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नोव्हेंबर महिन्यामध्ये संपूर्ण बागेभोवतीचे गवत काढून घेतले जाते. त्यानंतर बागेभोवती आगरेषा काढून घेतल्या. ही आगरेषा सायंकाळी उशिरा काढण्यात आली.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात काजू उत्पादन सुरू झाले. परंतु मिळत असलेल्या उत्पादनाचे प्रमाण तुलनेने कमी होते. मात्र पुढे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून उत्पादनात हळूहळू वाढ होत गेली.

यंदाचा हंगाम साधारपणे मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालू होता. त्यानंतर पालवी काजूचे किरकोळ स्वरूपात उत्पादन मिळाले. ते देखील संपत आले आहे. काही झाडांवर अल्प प्रमाणात काजू बी असून ते गोळा करण्याचे काम सुरू आहे. झाडावरून पडलेली काजू बी गोळा केल्यानंतर ती स्वच्छ पाण्यात घेण्यात आले. त्यानंतर हलके ऊन देऊन वाळवून घेतले. आणि नंतर ती पिशवीत बंद करून ठेवली जाते.

सध्या बागेत स्वच्छतेच्या कामांवर भर देण्यात आला आहे. बागेतील झाडाखाली पडलेला पालापाचोळा गोळा करून तो झाडांच्या बुंध्यावर घालणे, शिल्लक काजू बी गोळा करणे ही कामे बागेत सुरू आहेत.

याशिवाय बागेतील मर झालेली झाडे मुळासकट काढण्याचे काम सुरू आहे. त्याजागी नवीन लागवड करण्यासाठी खड्डे काढण्याचे काम सुरू आहे.

मागील काही दिवसांत मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाला आहे. परंतु, मॉन्सूनचा पाऊस सुरू होत नाही तोवर झाडांना रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जाणार नाहीत. कारण दिलेली खतमात्रा झाडांना उपलब्ध होण्यास अडचण येते. त्यासाठी मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर काही काळ उघडीप राहते. त्याकाळात रासायनिक खतमात्रा देण्याचे नियोजित आहे.

सध्या बागेतील पालापाचोळा गोळा करून बागेच्या स्वच्छतेवर भर दिला आहे. बागेत वाढलेली छोटी झुडपे काढून टाकली जात आहेत.

आगामी नियोजन

पावसाने उघडीप दिल्यानंतर साधारण जून आणि ऑगस्ट महिन्यांत रासायनिक खत आणि सेंद्रिय खतांच्या प्रति झाड मात्रा दिल्या जातील.

मॉन्सून पाऊस कालावधीत काजू बागेत कोणतीही कामे करणे शक्य होत नाही. बागेत पावसाचे पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेतली जाते. बागेतील अतिरिक्त पाणी बाहेर जाण्यासाठी व्यवस्था केली जाते.

सप्टेंबरपर्यंत बागेत तण चांगल्या प्रमाणात वाढलेले असते. तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर केला जात नाही. सप्टेंबर महिना अखेरीस ग्रासकटरच्या साह्याने तण कापले जाईल. कापलेले तण बागेतच ठेवले जाते. जेणेकरून परतीच्या पावसावेळी तण पूर्णपणे कुजून जाते. त्याचे चांगले परिणाम मिळतात.

ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये काजू झाडांना पालवी येण्यास सुरुवात होते. पालवी आल्यानंतर संपूर्ण बागेचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर कीड-रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाते. दरवर्षी साधारणपणे १५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत पहिली फवारणी घेतली जाते. त्यानंतर मोहर आल्यानंतर दुसरी आणि लहान आकाराची फळे लागल्यानंतर तिसरी फवारणी केली जाईल. याच कालावधीत पाऊस, ढगाळ वातावरण, धुके आदी बाबींचा विचार करून कोणती फवारणी करायचे हे ठरविले जाते.

मनोहर फोंडके, ९५२७३२२४६४

(शब्दांकन : एकनाथ पवार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT