Chemical Fertilizer : रासायनिक खतांचा भरमसाठ वापर, जमिनीची सुपीकता होतेय का नष्ट

Kharip Crop : खरीप पिकांना सर्वसाधारणपणे हेक्टरी २५० ते ३०० किलो तर उसाला हेक्टरी ६०० किलोपर्यंत खताचे प्रमाण ठरले आहे.
Chemical Fertilizer
Chemical Fertilizeragrowon

Kolhapur Chemical Fertilizer : आपल्या पिकाचं उत्पन्न भरपूर येण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात रासायनिक खते आणि औषधांचा पिकांवरील मारा वाढला आहे. उसासाठी आवश्यक प्रमाणापेक्षा साधारण दुपटीने खतांचा डोस दिला जात असून यामुळे जमिनीची सुपिकता धोक्यात येत आहे. यंदा तर शास्त्रीय आधारानुसार ठरलेल्या प्रमाणापेक्षा कित्येक हजार टन खताच्या मागणीला मंजुरी मिळाल्याने हे चित्र स्पष्ट होत आहे.

दोन दशकात चित्री, उचंगी आणि आंबेओहोळ मध्यम प्रकल्पासह गडहिंग्लज तालुक्यातील सहा लघु पाटबंधारे तलावातील बारमाही पाण्यामुळे उसाचे उत्पादक वाढले आहे. विहिरी, कूपनलिकांची संख्याही मोठी आहे. पाणी आलं म्हटलं, की लाव ऊस अशी परिस्थिती तयार झाल्याने खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी साधारण पन्नास टक्के क्षेत्र उसाचे आहे.

नगदी पीक म्हणून भाजी उत्पादकांची संख्याही मोठी आहे. परिणामी अधिक उत्पन्न आणि पिकाची झटपट वाढ व्हावी या उद्देशाने शेतकरी रासायनिक खते व औषधांचा मारा बेसुमार करीत आहेत. वारंवार युरिया खताची टंचाई निर्माण होणे हा त्याचाच एक भाग असल्याचे म्हटले जाते. तालुक्यात २८ हजार ८४० हेक्टर क्षेत्र खरिपाचे तर १२ हजार हेक्टरमध्ये ऊस आहे.

खरिपातील भात, सोयाबीन व भुईमुगाला युरिया, डीएपी व काही संयुक्त खतांची गरज असते. भरणीनंतर उसाला युरिया व संयुक्त खतांची मोठी मागणी असते. खरीप पिकांना सर्वसाधारणपणे हेक्टरी २५० ते ३०० किलो तर उसाला हेक्टरी ६०० किलोपर्यंत खताचे प्रमाण ठरले आहे.

परंतु, उसासाठी वापर होणाऱ्या खताचा विचार केला तर हा आकडा हेक्टरी ८०० ते १०० किलोवर जातो. परिणामी एकूण उसासाठी वापर होणाऱ्या खताचा विचार केला तर हा आकडा हेक्टरी ८०० ते १०० किलोवर जातो. परिणामी एकूण लागवडीखालील क्षेत्रासाठी हेक्टरी खताचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने गतवर्षीचा खतांचा आढावा घेऊन कृषी विभगाकडून पुढील वर्षीच्या खताची मागणी केली जाते.

Chemical Fertilizer
Organic Fertilizer Adulteration : रसायनांची भेसळ करीत विकली जातात जैविक खते

यंदा खात्याने तालुक्यासाठी एकूण १२ हजार ३२० टनाच्या खताची मागणी केली असून या कोट्याला मंजुरी मिळाली आहे. परंतु, दुसरीकडे आवश्यक प्रमाणानुसार लागवडीखालील क्षेत्रासाठी सरासरी हेक्टरी ६०० किलो खताची मात्रा गृहीत धरली तरी तालुक्याची ९ हजार ८८७ टन खतांमध्ये गरज भागते. गरजेपेक्षा अधिक उठाव असल्यानेच खात्याकडून दोन हजार टनाहून अधिक खतांची मागणी केल्याचे स्पष्ट होत आहे.

दृष्टिक्षेपात खतांची मागणी (आकडे टनामध्ये)

युरिया- ३९८४, डिएपी- १२१२, एसएसपी- १०८०, एमओपी- ७२०, संयुक्त खते- ५३२४

पुढच्या पिढीचे भविष्य ठरवण्याची वेळ

आपल्या पुढील पिढीला जमीन सुपीक आणि जिवंत द्यायची असेल तर आता शेतकऱ्यांनी जमिनीचा सांभाळ व सुपीकता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. रासायनिक खतांच्या माऱ्याने जमिनीची सुपिकता ढासळत आहे. शेणखतासह सेंद्रिय, कंपोस्ट, जीवाणू खतांचा संतुलित वापर न करता केवळ रासायनिक खते देऊन अधिकाधिक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

यामुळे जमीन अधिक काळ उत्पादनक्षम राहणार नाहीत. उत्पादकता अधिक घटतच जाईल. पूर्वी केवळ शेणखत एकमेव नैसर्गिक खत मिळायचे. मात्र पूर्वीच्या तुलनेत अलीकडील काही वर्षापासून बाजारात सेंद्रिय, जिवाणू, हिरवळीची खते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु त्याचा वापर करण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com