Poultry Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farming : लेअर कुक्कुटपालनात काटेकोर व्यवस्थापनावर भर

Farmer Management : शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत १९९८-९९ मध्ये नाशिक जिल्ह्यातील वजीरखेडे (ता. मालेगांव) तिसगे कुटुंबियांनी १ हजार पक्षी क्षमतेपासून ब्रॉयलर कुक्कुटपालनास सुरुवात केली.

Team Agrowon

शेतकरी नियोजन : कुक्कुटपालन

शेतकरी : शशिकांत श्रावण तिसगे

गाव : वजीरखेडे, ता. मालेगांव, जि. नाशिक

एकूण पक्षी गृहे : ५

पक्षी क्षमता : ८० हजार पक्षी

शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत १९९८-९९ मध्ये नाशिक जिल्ह्यातील वजीरखेडे (ता. मालेगांव) तिसगे कुटुंबियांनी १ हजार पक्षी क्षमतेपासून ब्रॉयलर कुक्कुटपालनास सुरुवात केली. पुढे २००६ पर्यंत २० हजार पक्ष्यांपर्यंत संगोपन क्षमता वाढवीत नेली. मात्र बर्ड फ्ल्यू आजारामुळे व्यवसायात मोठे नुकसान झाले.

त्यानंतर व्यवस्थापन पद्धतीत योग्य ते बदल करत अंडी उत्पादनाच्या दृष्टीने लेअर कुक्कुटपालन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार २००७ मध्ये सुरुवातीला १० हजार पक्षी क्षमतेचे एकच पक्षीगृह उभारत त्यात संगोपन करण्यास सुरुवात केली.

टप्प्याटप्प्याने त्याचा विस्तार करत गेले. आजमितीला तिसगे कुटुंबाकडे सुमारे ८० हजार पक्षी क्षमतेची ५ पक्षी गृहे आहेत. यासह १३ हजार पक्षी क्षमतेचे ब्रुडर फार्म व सहा आठवड्यापासून पुढील वयाच्या पक्ष्यांसाठी ग्रोइंग विभाग देखील आहे.

बॅच नियोजन :

बॅच नियोजनानुसार सुमारे १२ ते २० हजार पक्ष्यांची एक बॅच घेतली जाते. त्यासाठी एक दिवसाच्या पिलांची पूर्व नोंदणी करून उपलब्धता केली जाते.

पुढे ब्रुडींग व ग्रोईंग पूर्ण झाल्यानंतर १५ ते २० आठवडे वयाचे पक्षी अंडी उत्पादनासाठी ठेवले जातात.

प्रत्येक बॅच सुरू करण्यापूर्वी पक्षी गृहाचे निर्जंतुकीकरण करण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यात विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या तोट्या व निपलची स्वच्छता केली जाते. शेडच्या खालील भागात चुना मारून घेतला जातो. यासह शिफारशीनुसार औषधांच्या फवारण्या केल्या जातात.

पक्ष्यांना पहिल्या दिवसातून निपलने पाणी दिले जाते. पाण्यासाठी स्वतंत्र आरओ प्लांट कार्यान्वित केला आहे. जेणेकरून पाण्याद्वारे कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही. पक्ष्यांना वर्षभर मुबलक पाण्याची उपलब्धता होण्यासाठी सुमारे १ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे त्यांच्याकडे आहे.

प्रत्येक बॅचमधील पक्ष्यांना गुणवत्तापूर्ण पोषक खाद्य देऊन अंडी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी खाद्यामध्ये प्रो बायोटिक, खनिजद्रव्ये यांची संतुलित मात्रा दिली जाते. अँटी बायोटिकचा वापर टाळला जातो.

वाढीच्या अवस्थेनुसार लसीकरण :

पक्षी शेडवर आणल्यानंतर पहिल्याच दिवशी लसीकरण केले जाते. त्यानंतर सातव्या दिवशी राणीखेत व नंतर लासोटा

लसीकरण डोळ्यातून केले जाते.

पक्ष्यांच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत ८ ते १० प्रकारचे लसीकरण केले जाते. जेणेकरून पक्ष्यांचे आरोग्य उत्तम राहून मरतूक टाळली जाईल.

वेळेवर लसीकरण केल्याने पक्ष्यांची रोग प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते.

पक्षी गृह परिसरात जैव सुरक्षिततेला विशेष महत्त्व दिले जाते.

खाद्य उत्पादनात स्वयंपूर्णता

कुक्कुटपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्याकरिता गुणवत्तापूर्ण खाद्याची उपलब्धता होण्यासह उत्पादन खर्च नियंत्रित राखणे आवश्यक असते. त्यासाठी श्री. तिसगे यांनी स्वतःची फीड मील उभारली आहे. या फीड मीलद्वारे ताशी ४ टन खाद्य तयार केले जाते. तयार खाद्याची साठवणूक करण्यासाठी प्रत्येक पक्षी गृहात ५ ते १० टन क्षमतेचे सायलो उभारलेले आहेत.

पक्ष्यांना खाद्य वितरण करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारली आहे.

खाद्य निर्मितीमध्ये कच्चा माल म्हणून मका, सोयाबीन व राइस ब्रान यांचा वापर केला जातो. कच्चा मालाची आवश्यकतेनुसार आधीच खरेदी करून ठेवली जाते. त्यामुळे बाजारात आवक कमी झाल्यानंतर चढ्या दराने खरेदीची वेळ येत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च नियंत्रणात राखण्यास मदत होते.

आधुनिक तंत्रज्ञानावर भर :

उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे पक्ष्यांवर ताण येतो. हीच बाब ध्यानात घेऊन श्री. तिसगे यांनी सर्व पक्षिगृहात स्वयंचलित कॅलिफोर्निया पद्धतीवर आधारित नियंत्रित वातावरण राखणारी प्रणाली स्थापित केलेली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांतही पक्ष्यांवर वाढत्या तापमानाचा कोणताही परिणाम होत नाही. ही संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित प्रणालीवर चालते. त्यात २८ अंश सेल्सिअसवर तापमान निश्चित करण्यात आलेले आहे. जर तापमानात वाढ झाली तर स्वयंचलित पद्धतीने पंखे सुरू होतात. त्यामुळे मनुष्यबळाविना हे कामकाज सुरळीत पार पडते. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून सातत्याने सुधारणा करण्यावर श्री. तिसगे यांचा भर असतो.

दरांचा अंदाज घेऊन विक्री :

दररोज दुपारी १२ ते ४ या दरम्यान अंडी संकलन केले जाते. दररोज सरासरी ६० हजार अंडी उत्पादन मिळते. प्रत्येक शेडमधील अंडी संकलित झाल्यानंतर अंडी लिफ्टमधून खाली पाठवली जातात. त्यानंतर विक्रीपूर्व ती साठवणूक गोदामात ठेवली जातात. त्यासाठी २० मजूर ठेवले आहेत.

बाजारातील दर आणि उत्पादन खर्च यांचा ताळमेळ राखण्यासाठी अंड्याची शीतगृहात साठवणूक करून ठेवण्यात येते. अंडी साठविण्यासाठी १० लाख अंडी क्षमतेचे स्वतंत्र शीतगृह उभारले आहे. साठवणूक केलेल्या अंड्याचा बाजारातील मागणीनुसार पुरवठा केला होता.

आधुनिक तंत्रज्ञानावर भर :

उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे पक्ष्यांवर ताण येतो. हीच बाब ध्यानात घेऊन श्री. तिसगे यांनी सर्व पक्षिगृहात स्वयंचलित कॅलिफोर्निया पद्धतीवर आधारित नियंत्रित वातावरण राखणारी प्रणाली स्थापित केलेली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांतही पक्ष्यांवर वाढत्या तापमानाचा कोणताही परिणाम होत नाही. ही संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित प्रणालीवर चालते. त्यात २८ अंश सेल्सिअसवर तापमान निश्चित करण्यात आलेले आहे. जर तापमानात वाढ झाली तर स्वयंचलित पद्धतीने पंखे सुरू होतात. त्यामुळे मनुष्यबळाविना हे कामकाज सुरळीत पार पडते. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून सातत्याने सुधारणा करण्यावर श्री. तिसगे यांचा भर असतो.

दरांचा अंदाज घेऊन विक्री :

दररोज दुपारी १२ ते ४ या दरम्यान अंडी संकलन केले जाते. दररोज सरासरी ६० हजार अंडी उत्पादन मिळते. प्रत्येक शेडमधील अंडी संकलित झाल्यानंतर अंडी लिफ्टमधून खाली पाठवली जातात. त्यानंतर विक्रीपूर्व ती साठवणूक गोदामात ठेवली जातात. त्यासाठी २० मजूर ठेवले आहेत.

बाजारातील दर आणि उत्पादन खर्च यांचा ताळमेळ राखण्यासाठी अंड्याची शीतगृहात साठवणूक करून ठेवण्यात येते. अंडी साठविण्यासाठी १० लाख अंडी क्षमतेचे स्वतंत्र शीतगृह उभारले आहे. साठवणूक केलेल्या अंड्याचा बाजारातील मागणीनुसार पुरवठा केला होता.

अखंडित वीज पुरवठा सोय :

श्री. तिसगे यांची सर्व पक्षी गृहे ही वातावरण नियंत्रित असल्याने त्यासाठी चोवीस तास विजेचा अखंडित पुरवठा होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी एक्स्प्रेस वीज वितरण पुरवठा प्रणाली पक्षी गृहांसाठी वापरली आहे. यासह वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने वीजपुरवठा होण्यासाठी जनरेटर खरेदी करून गरजेनुसार त्याचा वापर केला जातो. याशिवाय अधिक काळ वीजपुरवठा खंडित झालेला आहे, याची पूर्वसूचना देण्यासाठी अलार्म (गजर) बसविले आहेत.

कुटुंबाची साथ :

संपूर्ण तिसगे कुटुंब कुक्कुटपालन व्यवसायात कार्यरत असते. शशिकांत यांचे वडील श्रावण हे ब्रूडिंग व ग्रोइंग हे कामकाज बघतात तर शशिकांत हे पक्षी व खाद्य खरेदी, विक्री व पुरवठा या आर्थिक नियोजनाचे कामकाज पाहतात. तर धाकटे बंधू रमाकांत हे सर्व कुक्कुटपालन व्यवसायातील तांत्रिक बाबींचे नियोजन पाहतात.

शशिकांत तिसगे, ९४२३१८४६१९

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT