Poultry Farming : तापमानवाढीने बिघडले कोंबड्याचे आरोग्य

Chicken health : दरातील तेजीसह वाढला उत्पादकता खर्च
Poultry Farming
Poultry Farming Agrowon

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur News : नागपूर ः कोंबडी दरातील तेजीमुळे पोल्ट्री व्यवसायाला अच्छे दिन आले असतानाच वाढत्या उन्हामुळे मर्तुंकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. सध्या ब्रॉयलर कोंबड्यांचे दर प्रतिकिलो १२५ ते १३० रुपयांवर पोचले आहेत. दुसरीकडे उत्पादकता खर्चातही वाढ होत हा खर्च ११० रुपये प्रतिकोंबडीवर गेल्याची माहिती या व्यवसायातील सूत्रांनी दिली.

उन्हाळ्यात तापमानात जसजशी वाढ होते, तसा मानवी आरोग्यासह पशुपक्ष्यांच्या जीवनावरही परिणाम होतो. त्यांची कार्यक्षमता कमी होते. अति उष्णतेने पक्ष्यांचे वजन घटत आहे. तसेच पुरेसे खाद्य दिल्यानंतरही त्यांचे वजन वाढत नसल्याचे चित्र आहे. परिणामी उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या वरील बाजूस तुराट्या किंवा गवत अंथरणे, त्यावर स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाण्याचा शिडकावा करणे, शेडच्या दोन्ही बाजूस बारदाना किंवा हिरवी नेट बांधणे अशा उपायांवर पोल्ट्री व्यावसायिकांकडून भर दिला जात आहे. यानंतरही मर्तुंक नियंत्रणात न आल्यास वैद्यकीय उपचारावर खर्च करावा लागत असल्याची माहिती पोल्ट्री व्यावसायिक शुभम महाले यांनी दिली.
गेल्यावर्षी १ हजार पक्ष्यांमागे ६ ते ८ पक्ष्यांचा मृत्यू असे प्रमाण होते. परंतु यावेळी तापमान आताच ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने हे प्रमाण १० ते १२ कोंबड्यांवर गेल्याचा दावा शेतकरी करीत आहेत.

Poultry Farming
Poultry Management : वातावरण बदलानुसार कोंबड्याचे व्यवस्थापन

बाजारात पक्ष्यांची आवक कमी असल्याने दरात तेजी आहे. सध्या प्रतिकिलो दर १२५ ते १३० रुपयांवर आहे. त्यामुळे कंपन्यांनी एका दिवसाच्या पक्ष्याच्या दरात मोठी वाढ केली आहे. पूर्वी एक दिवसाचा पक्षी २५ रुपयांत होता, आता याचे दर ५१ रुपयांवर पोचले आहेत. परिणामी २ किलो वजनाच्या पक्ष्यासाठी उत्पादन खर्च १०५ ते ११० रुपयांवर गेला आहे. पूर्वी हा खर्च अवघा ८५ रुपये होता. त्यामुळे नफ्याचे प्रमाणही कमी झाले.
- शुभम महाले, सदस्य,
राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समिती


३५ अंश सेल्सिअसपेक्षा तापमानात वाढ झाल्यास कोंबड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. काही भागात पारा ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे पक्ष्यांची काळजी घेतली पाहिजे. खाद्य, आणि पाणी योग्य प्रमाणात न दिल्यास पक्ष्यांचे वजन कमी होते. मर्तुंकही वाढू शकते. त्यामुळे तापमान नियंत्रणासाठी पूरक उपाययोजनांवर भर द्यावा.
- डॉ. मुकुंद कदम, प्रमुख, कुक्‍कुटशास्त्र विभाग,
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com