Soybean Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Farming : उत्पादनक्षम जातींच्या निवडीवर भर

Soybean Production : संदीप श्रीपाल गाडवे हे गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी १ ते २ एकर सोयाबीन लागवड करतात. ऊस गेल्यानंतर शेत तयार करून सोयाबीनची टोकण केली जाते.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Soybean Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : सोयाबीन

शेतकरी : संदीप गाडवे

गाव : कवठेसार, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

सोयाबीन क्षेत्र : दोन एकर

संदीप श्रीपाल गाडवे हे गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी १ ते २ एकर सोयाबीन लागवड करतात. ऊस गेल्यानंतर शेत तयार करून सोयाबीनची टोकण केली जाते. रोहिणी नक्षत्र प्रारंभ होण्यापूर्वीच पेरणीचे नियोजन असते. साधारणतः १० ते २० मे च्या दरम्यान सोयाबीनची टोकण केली जाते. शेत तयार करतेवेळी पावसास सुरवात झालेली नसते.

बागायती शेती असल्याने पाट पाणी देऊन तयार झालेले शेत भिजवले जाते. चार ते सहा इंच ओल झाल्यानंतर बियाणे टोकण केली जाते. शक्यतो महाबीजच्या ९३०५ या जातीची लागवड केली जाते. ही जात शंभर दिवसांत तयार होते. ही रोग प्रतिकारक जात आहे. एकरी अठरा ते वीस किलो बियाणे लागते. टोकण करण्यापूर्वी बीजप्रक्रिया केली जाते.

यामुळे रोपांची जोमदार वाढ होते. उसाचा बेवड असल्याने सोयाबीनला कमीत कमी खते देण्याचा प्रयत्न असतो. हलक्या जमिनीत लागवड असेल तर टोकण करतेवेळी एकरी १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ५० किलो डीएपी या खताची मात्रा देतो. माती परिक्षणानुसारच रासायनिक खतांची मात्रा दिली जाते.

टोकण केल्यानंतर सातव्या दिवशी पाणी देण्याचे नियोजन असते. आमच्या भागात जूनमध्ये पाऊस फारसा पडत नाही. जून-जुलै महिन्यांत आणखी एक पाणी दिले जाते. प्रतिकूल हवामानाचा अंदाज घेत संभाव्य कीड, रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीडनाशकाच्या फवारणीचे नियोजन केले जाते. जर पावसाने ओढ दिली तर दाणे भरण्याच्या वेळी पिकाला पाणी दिले जाते.

बाजारात इतर भागांतून सोयाबीन येण्यापूर्वी आपल्या शिवारातील सोयाबीन बाजारात यावे या उद्देशाने मे महिन्यामध्ये पेरणी केली जाते. पाणीपुरवठ्याची सोय असल्याने असल्याने पावसाची वाट पाहिली जात नाही. सप्टेंबरच्या पूर्वाधात परतीच्या पावसाची चिन्हे पाहून काढणी होते. एकरी १४ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते.

मळणी झाल्यानंतर लगेच स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. सुरुवातीच्या काळात चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल दर असतात. आतापर्यंत मला ४,८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. गेल्या वर्षी ७० गुंठे क्षेत्रात २२ क्विंटल उत्पादन घेतले, मात्र अपेक्षित दर मिळाला नव्हता.

यंदाचे नियोजन

उसाचा खोडवा गेल्यानंतर शेत नांगरून तयार केले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात एक ते दीड एकरात पावसाळा सुरू झाल्यानंतर सोयाबीन टोकण करणार आहे. यंदा काढणीस थोडा उशीर होणार हे गृहीत धरून या कालावधीत कोणती जात चांगली येईल याबाबत कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधून आहे. शक्यतो करून महाबीजचे बियाणे वापरणार आहे.

या बरोबरच बाजारात अन्‍य नवीन कोणकोणत्या जातीचे बियाणे उपलब्ध आहे, याची माहिती घेऊनच बियाणे खरेदी करणार आहे. टोकणीच्या दरम्‍यान वाफशाइतका पाऊस पडतो का, याचा अंदाज घेऊन जमिनीला पुरेसे पाणी देऊन वाफसा स्थितीत टोकण करणार आहे. माती परीक्षण अहवालानुसार एकरी १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ५० किलो डीएपी खताची मात्रा देण्याचे नियोजन आहे.

बीज प्रक्रिया करून टोकण करणार आहे. टोकण केल्‍यानंतर पहिल्या पंधरवड्यात किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कीडनाशकाची फवारणी करण्यावर माझा भर असतो. उगवण ते काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पिकाचे निरीक्षण करून तातडीने उपाययोजना केली जाते. दरवर्षी एकरी १३ क्विंटल उत्पादनाची सरासरी राखण्याचा माझा प्रयत्न असतो.

संदीप गाडवे, ९६२३५५७०७७, (शब्दांकन : राजकुमार चौगुले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief : नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी एनडीआरएफमधून राज्यांना निधी कसा मिळतो?

PM Modi: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार ४२ हजार कोटींची भेट, दोन दिवसांत मोठी घोषणा

Farm Mechanization : नांदेडला कृषी यांत्रिकीकरणाचा खर्च केवळ ३० लाख खर्च

Rohit Pawar: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्यावे: रोहित पवार

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ३ लाख ५२ हजार हेक्टरला तडाखा

SCROLL FOR NEXT