Seed Production : महाबीजचे १९ हजार हेक्टरवर खरीप बीजोत्पादन प्रस्तावित

Kharif Season : यंदाच्या प्रस्तावित बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये केवळ सोयाबीन या पिकाचे क्षेत्र सर्वाधिक १८ हजार ८२६ हेक्टर असून त्यापासून २ लाख ३३ हजार ३४५ क्विंटल कच्चे बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.
Seed Production
Seed ProductionAgrowon

Parbhani News : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये यावर्षीच्या (२०२४-२५) खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्युट या पिकांचा मिळून एकूण १९ हजार ४२२ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित आहे.

त्यापासून २ लाख ३७ हजार ३६९ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. गतवर्षीच्या (२०२३-२४) खरिपातील १५ हजार ३२ हेक्टरच्या तुलनेत यंदा बीजोत्पादन क्षेत्रात ३० टक्के वाढ करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड यांनी दिली.

महाबीजच्या परभणी विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्युट या पिकांच्या वेगवेगळ्या वाणांचा प्रमाणित व पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. यंदाच्या प्रस्तावित बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये केवळ सोयाबीन या पिकाचे क्षेत्र सर्वाधिक १८ हजार ८२६ हेक्टर असून त्यापासून २ लाख ३३ हजार ३४५ क्विंटल कच्चे बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.

Seed Production
Seed Production : आगामी खरिपासाठी ‘महाबीज’ची बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना

सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एमएयूएस-६१२, एमएयूएस-१६२, एमएयूएस -५८, एमएमएयूएस -७१ या वाणांचा समावेश आहे.

इतर वाणांमध्ये जेएस-३३५, डीएस-२२८, फुले संगम, केडीएस ७५३ (फुले किमया), फुले दुर्वा, सुवर्ण सोया या वाणांचे बीजोत्पादन घेण्यात येणार आहे. तुरीच्या गोदावरी, बीएसएमआर-७११, बीडीएन-७१६ या वाणांचे एकूण ८८ हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित असून ८७७ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.

उडदाच्या एकेयू १०-१, टीएयू-१ या वाणांचे २१५ हेक्टरवर बीजोत्पादन असून १ हजार ४९५ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. मुगाच्या उत्कृर्षा, बीएम-२००२-१, बीएम-२००३-२ या वाणांचे ९७ हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित असून ७०० क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. ज्युटचे १९६ हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित असून ९५१ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.

Seed Production
Seed Production : ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राज्यभर घेतला जाणार

एकूण बीजोत्पादन क्षेत्रानुसार परभणी जिल्ह्यात ६९ हजार ६७४ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात ५४ हजार ९०४ किंटल, नांदेड जिल्ह्यात २२ हजार ५२७ क्विंटल, लातूर जिल्ह्यात ६० हजार ३११ क्विंटल, धाराशिव जिल्ह्यात २६ हजार ७६७ क्विंटल, सोलापूर जिल्ह्यात ३ हजार ५८४ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. विभागातील सर्व सहा जिल्ह्यांतील महाबीजच्या जिल्हा कार्यालयात बीजोत्पादन कार्यक्रमाची अग्रीम नोंदणी सुरू झाली आहे. बीजोत्पादक शेतकऱ्यांनी संपर्क करावा, असे आवाहन कान्हेड यांनी केले.

परभणी विभाग खरीप बीजोत्पादन

प्रस्तावित क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)

जिल्हा सोयाबीन तूर मूग उडीद ज्युट एकूण

परभणी ५४८४ २७ ८८ १६ ११७ ५७३२

हिंगोली ४४४६ ००० ००० ००० ००० ४४४६

नांदेड १७९५ ००० ००० ४३ २८ १८६६

लातूर ४७६३ ३८ ९ ४७ ४१ ४८९८

धाराशिव २०७१ १६ ००० ६५ १० २१६२

सोलापूर २६७ ७ ००० ४४ ००० ३१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com