Jalna News: दुबईमध्ये आपल्या केसरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर यावर्षी आपण लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठवण्याची तयारी करत असल्याचेही सांगितले. या प्रकारामुळे यावर्षी आपला आंबा अमेरिका जपान युरोप तसेच दुबईला सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यासाठी संधी असल्याचे मत आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले..ॲग्रो इंडिया गट शेती संघाचा 258 वा द्वादश कार्यक्रम महा केसर आंबा बागायतदार संघाचे संचालक प्रकाश कापसे यांच्या देळेगव्हाण (ता. जाफराबाद) येथील बागेत उत्साहात पार पडला. त्यावेळी डॉ. कापसे बोलत होते. नुकतेच डॉ. कापसे हे ॲग्रोवनने आयोजित केलेल्या दुबई दौऱ्यास जाऊन आले..Kesar Mango Farming: केसर आंबा फळांची विरळणी आवश्यक.प्रकाश कापसे यांनी अति घन लागवड पद्धतीने अत्याधुनिक अशी केसर आंबा बाग यावर्षी अप्रतिम आणि नेहमी पेक्षा अगदी 15 दिवस अगोदर फळधारणा केली. हे पाहून डॉ. कापसे यांनी समाधान व्यक्त केले. डॉ. कापसे म्हणाले की, आतापर्यंत आपण कापूस, सोयाबीन, आले, कांदा बीजोत्पादनमध्ये भरीव प्रगती केली..Mango Fruit Drop Issue: पालीत आंबागळतीचे वाढत्या उन्हामुळे संकट.एकरी उत्पादकता अगदी अडीच ते चार पट वाढवली.त्याचबरोबर आता आपण अत्याधुनिक अशा अति घन लागवड आंबा बागेकडे वळणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत महाराष्ट्रातील केसर हा उत्तरेत मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करता येणे शक्य होणार असल्याचेही ते म्हणाले..यावेळी कापूस तज्ज्ञ डॉ. एस. एस. माने, प्रा. मुजफ्फर, डॉ, शरद कापसे यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश कापसे यांनी कुक्कुटपालनाविषयी आपले अनुभव सांगितले. लक्ष्मण सवडे यांनी गट शेतीची आतापर्यंत यशस्विता वर्णन केली. या कार्यक्रमात सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोशी गावचे आंबा बागायतदार सूरज राठोड आपल्या चार सहकाऱ्यांसह आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सखाराम कापसे, प्रकाश कापसे, दिनेश कापसे, शरद कापसे यांनी प्रयत्न केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.