Soybean Management : सोयाबीन पिकातील पाणी बचतीचे उपाय

Soybean Crop : सोयाबीन पीक सध्या शाखीय वाढीच्या आणि फुलधारणा अशा महत्वाच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थीतीत पावसानं ओढ दिल्यामुळे सोयाबीन ला पाणी कमी पडतय. अशावेळी कमी पाण्यात सोयाबीन तग धरु शकेल यासाठी कोणते उपाय आहेत?
Soybean
Soybean Agrowon

Soybean Irrigation : सोयाबीन पीक सध्या शाखीय वाढीच्या आणि फुलधारणा  अशा महत्वाच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थीतीत पावसानं ओढ दिल्यामुळे सोयाबीन ला पाणी कमी पडतय.  अशावेळी कमी पाण्यात सोयाबीन तग धरु शकेल यासाठी कोणते उपाय आहेत? आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर येणाऱ्या किडीचं नियंत्रण कसं कराव? याची माहिती पाहुया.

सोयाबीनला फुले लागण्याच्या आणि वाढीच्या अशा संवेदनशिल   अवस्थेत पाणी कमी पडत असेल तर संरक्षित पाण्याच्या दोन पाळ्या द्या. पाण्याचा ताण जास्त असल्यास कओलिन या परावर्तकाची ८ टक्के किंवा पोटॅशिअम नायट्रेट ०.५ ते १ टक्का याप्रमाणात फवारणी करा. या परावर्तकामुळे सोयाबीन च्या पानावर एक पारदर्शक थर तयार होतो. त्यामुळे पानातून पाण्याच बाष्पीभवन होत नाही. त्यामुळे  पाणी कमतरतेच्या काळातही पीक तग धरुन राहते. याशिवाय पिकाच्या दोन ओळीत  शेतातील वाळलेलं गवत, भात, गहू, सोयाबीनचा भुसा आच्छादन म्हणून टाका. पिकाला मोकाट पाणी न देता ठिबक सिंचनान पाणी द्या. सोयाबीनच्या झाडाची जास्तीची वाढ रोखण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी पीक फुले लागण्याच्या अवस्थेत असताना सायकोसील या संजीवकाची ५०० पीपीएम म्हणजेच १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. 

Soybean
Soybean Pest Management : सोयाबीन पिकातील किडींचे नियंत्रण

सध्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान आहे. या ढगाळ हवामानामुळे सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या खोडमाशीच्या नियंत्रणासाठी क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. पाने खाणाऱ्या अळीचा अटॅक झाला असेल तर पिकामध्ये हेक्टरी ५ या प्रमाणात स्पोडोल्यूरचा वापर करुन कामगंध सापळे लावा. शक्य असल्यास प्रकाश सापळ्याचा वापर करा. अशा प्रकारे उपलब्ध पाण्याच योग्य नियोजन करुन सोयाबीन उत्पादनातील घट रोखता येईल. या माहितीविषयी तुमच्या काही शंका असल्यास आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा आणि अॅग्रेवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरु नका. 

माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com