Akola News: अकोला जिल्ह्यात सध्या पाचशे एकरांवर तुतीची लागवड आहे. या पार्श्वभूमीवर, नव्याने ६०० एकरांचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. महारेशीम अभियानाच्या माध्यमातून जेथे पूर्वी तुतीची लागवड आहे, अशा गावांमध्ये व त्याच्या लगतच्या गावांमध्ये नवीन तुती लागवडीसाठी प्रसिद्धी व प्रचार केला जाणार आहे. याबाबतच्या प्रचार रथाचा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला..नवीन तुती लागवड करण्याचा रेशीम विभागासाठी २०० एकर, कृषी विभागासाठी २०० एकर, पंचायत विभागासाठी २०० एकर असा एकूण ६०० एकर लक्ष्यांक अकोला जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे..Sericulture Farm Success: रेशीम उद्योगामुळे समस्या झाल्या दूर.अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना अंतर्गत एक एकर क्षेत्रासाठी तीन वर्षांसाठी ४ लाख ३२ हजार २४० रुपये मजुरी व साहित्यासाठी देण्यात येतात.बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र -२ या योजनेमधून तुती लागवड एक एकर क्षेत्रासाठी ४५ हजार, ठिबक सिंचन योजनेसाठी ४५ हजार, रेशीम कीटक संगोपन गृह बांधकामासाठी २ लाख ४३ हजार ७५० रुपये तर कीटक संगोपन साहित्य खरेदीसाठी ३७ हजार ५०० व निर्जंतुकीकरण औषध खरेदीसाठी ३७५० असे एकूण ३ लाख ७५ हजार अनुदान दिले जाते..Sericulture Farming: शेतकऱ्यांमध्ये कौशल्य विकसित करणारी रेशीम शेती फायदेशीर.पारंपरिक पिकासोबत किमान एक एकर तुती लागवड करून रेशीम उद्योग हा जोड धंदा सुरू करून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी मीना यांनी केले आहे. नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी कोणत्याही विभागामार्फत केली असली तरी सुद्धा रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन मोफत जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे केले जाईल असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनील दत्त फडके यांनी सांगितले..अडीच लाखांपर्यंत उत्पन्नजिल्ह्यात तुती लागवडीखालील क्षेत्र वाढत असून कोष विक्रीसाठी बडनेरा, जालना, बीड येथे रेशीम कोष बाजार सुरू करण्यात आला आहे. सध्या ७५० प्रति किलो कोषाचा दर असून प्रति एकरी दुसऱ्या वर्षापासून शेतकरी दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन घेत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.