Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या नसल्यावरून पेच

Farmers Deprived of Help : नुकसानासाठी ३३२ कोटी ९६ लाख ९६ हजार २८८ रुपयांची आर्थिक मदत देखील मंजूर झाली आहे. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या नसल्याने मोठा खोळंबा निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान आलेल्या या आपत्तीमुळे जिल्ह्यातील एक लाख ८९ हजार ६८१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. या नुकसानासाठी ३३२ कोटी ९६ लाख ९६ हजार २८८ रुपयांची आर्थिक मदत देखील मंजूर झाली आहे. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या नसल्याने मोठा खोळंबा निर्माण झाला आहे.

कृषी सहायक व ग्रामसेवक संघटनांनी याद्या अपलोड करण्यास यापूर्वीच विरोध दर्शवलेली असून त्यातूनच ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे.जिल्ह्यात नोव्हेंबर अखेर झालेल्या पावसाने २ लाख ४६ हजार १८८ शेतकऱ्यांचे १ लाख ८९ हजार ६८१ हेक्टरवरील कापूस , तूर, हरभरा, गहू, भाजीपाला, कांदा, केळी, पपई, लिंबू, पेरू, संत्रा पिकांचे नुकसान झाले.

कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाने संयुक्त पंचनामे केले. मध्यंतरी नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश दिले. ३१ जानेवारी रोजी महसूल व वन विभागाने ३३३ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली. याद्या अपलोड करण्याची कार्यवाही सुरू न झाल्याने नुकसानग्रस्तांना किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हे निश्‍चित नाही. मागील वर्षांपासून शासनातर्फे शेतकऱ्यांच्या खात्यावर (डीबीटीद्वारे) आर्थिक मदत दिली जाते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड होणे आवश्यक आहे. खरिपातील अतिवृष्टीच्या याद्या अपलोड करताना कृषी सहाय्यक संघटनेकडून विरोध दर्शविला होता. याद्या अपलोड करण्याची कार्यवाही महसूल यंत्रणांची आहे, याद्या अपलोड करण्याचे कामही कृषी सहायकांनी करावे, असा आग्रह कितपत योग्य आहे.

तोडगा काढण्याची गरज

शासनाकडून भरपाई जाहीर होऊनही जर संघटनांच्या अपापसातील कारणांमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहत असतील तर ही चिंताजनक बाब आहे. पालकमंत्री शनिवार (ता.१०) पासून दोन दिवस दौऱ्यावर असून, त्यांनी यावर तोडगा काढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

...अशी मिळेल मदत

जिरायतीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ३६ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT