Kolhapur Elephant agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Elephant : कोल्हापुरातील हत्तीच्या वावर शेतकऱ्यांची डोकेदुखी, वनअधिकाऱ्यांची कसरत

Chandgad Elephant : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात मागच्या ४ दिवसांपासून धुमाकूळ घातलेला टस्कर हत्ती अखेर जंगलात गेला.

sandeep Shirguppe

Forest Department Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात मागच्या ४ दिवसांपासून धुमाकूळ घातलेला टस्कर हत्ती अखेर जंगलात गेला आहे. हत्तीला चिंचणे जंगलात घालविण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारची रात्र जागवली. रात्री नदीच्या आल्याड, पल्याड करणाऱ्या हत्तीने अखेर रविवारी पहाटे तीन वाजता चिंचणे जंगलात प्रवेश केला. रविवारी दिवसभर मात्र हत्ती जंगलातून बाहेर आला नसल्याने त्याचे दर्शन झाले नाही.

चिंचणे व हडलगे जंगलात हत्ती असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. त्यामुळे दंडगे, चिंचणे, कामेवाडी, तेऊरवाडी व हडलो भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा वनविभागाने दिला आहे. शनिवारी टस्कर हत्ती कुदनूर परिसरात आला होता.

दिवसभर शेती पिकांतून धुडगूस घालत सायंकाळी दुंडगे येथे ताम्रपर्णी नदीच्या काठावरील उसाच्या पिकात लपला होता. रात्री उशिरापर्यंत पाटणे वनपरिक्षेत्राचे अधिकारी प्रशांत आवळे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल जे. आर. डिसोझा, एन. एम. धामणकर, आर. बी. पाटील यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी हत्तीवर लक्ष ठेवून होते.

हत्ती चिंचणे जंगलात जाईल, या शक्यतेने रात्री अकरा वाजेपर्यंत वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी दुंडगे ते चिंचणे रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती. काही काळ वाहतूक पर्यायी मागनि वळवली होती. शेतात राखणीला असलेल्या शेतकऱ्यांना घरी पाठविले.

जंगलाची हद्द केवळ पाचशे फुटांवर असताना हत्तीने रात्रभर वनविभागाला गुंगारा दिला. हत्तीला जंगलात घालविण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी व नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले.

फटाके फोडणे, डबे वाजविणे, बॅटरीचा प्रकाश मारणे अशा अनेक मार्गांचा वापर करुन हत्तीला जंगलात घालविण्याचा प्रयत्न केला. अखेर पहाटे तीन वाजता हत्तीने जागा सोडली व चिंचणे जंगलात प्रवेश केला. चिंचणे व हडलगे जंगलात घनदाट झाडी असल्याने हत्ती जंगलात स्थिरावला असल्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. दरम्यान, हत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांच्या पिकांचे आज पंचनामे केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT