Elephant Damage Crop : एका हत्तीचा प्रशासनाला बंदोबस्त करता आला नाही, ५ दिवसांत केळीसह उसाचं नुकसान

Sugarcane Banana Crop : दोनशे केळीची झाडे मोडून फस्त केली असून उसाचेही मोठे नुकसान केले आहे. आजरा तालुक्यातून या हत्तीने गडहिंग्लज तालुक्यात प्रवेश केला आहे.
Elephant Damage Crop
Elephant Damage Cropagrowon
Published on
Updated on

Kolhapur Elephant Damage Crop : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे गेले पाच दिवस हत्तीने तालुक्यातील मासेवाडी व मांगनूर तर्फ सावतवाडी येथील शेती पिकात धुडगूस घातला आहे. तब्बल दोनशे केळीची झाडे मोडून फस्त केली असून उसाचेही मोठे नुकसान केले आहे. आजरा तालुक्यातून या हत्तीने गडहिंग्लज तालुक्यात प्रवेश केला आहे. तीन दिवस हत्तीने मागनूर गावाच्या जंगलात मुक्काम करून काल (ता. २९) तो मासेवाडीत गेला. आज (ता. ३१) तो पुन्हा सावतवाडीच्या जंगलात दाखल झाला आहे. दरम्यान, या पाच दिवसात हत्तीने शेती पिकाचे मोठे नुकसान केले आहे.

सावतवाडीत वसंत सावंत, प्रकाश पाटील यांचा प्रत्येकी दोन गुंठे ऊस, विमल कांबळे यांचा चार गुंठ्यातील ऊस आणि शशिकांत नागवेकर यांची २० केळीची झाडे मोडून नुकसान केले आहे.

तसेच मासेवाडीतील सुरेंद्र गायकवाड यांच्या आंब्याची पाच झाडे, १५० केळीची झाडे मोडून नुकसान केले आहे. याशिवाय त्यांचाच एक गुंठ्यातील ऊस भुईसपाट झाला आहे. वनरक्षक सुनील भंडारी यांनी नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.

कित्येक वर्षांपासून आजरा तालुक्यात टस्कराचा वावर आहे. अधून-मधून तो गडहिंग्लज तालुक्याच्या हद्दीतही येत असतो. गतवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान हाच हत्ती मासेवाडी- सावतवाडी परिसरात आला होता. त्यानंतर आता पुन्हा तो आजरा तालुक्यातील सुळे, लाकूडवाडीमागें महागावच्या हद्दीतून मांगनूर तर्फ सावतवाडीत दाखल झाला आहे.

Elephant Damage Crop
Kolhapur Elephants in Farm : हत्तींचा बंदोबस्त होणार का? कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी हवालदिल

या प्रवासात या हत्तीने ठिकठिकाणच्या शेतातील पिकांचे नुकसान केल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी (ता. २६) सकाळी आलेल्या या टस्कराने तीन दिवस मांगनूरच्या हद्दीतील जंगलात मुक्काम ठोकला आहे. शेजारीच तलाव असल्याने पाणी पिऊन पुन्हा तो जंगलात जात आहे. या तीन दिवसांत तानाजी चव्हाण, अशोक शिंदे, भाऊसाहेब शिंगटे, प्रकाश पाटील यांच्या शेतातील ऊस, ज्वारी पिकाचे नुकसान केल्याचे सांगण्यात आले.

हुसकावण्याचा प्रयत्न करू नये

गतवर्षीही याच भागात हत्ती आला होता. पुन्हा या परिसरातच हत्तीने मुक्काम ठोकल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, तसेच एकट्याने शेतवडीत न जाण्याचे आवाहन वन खात्यातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, हत्तीच्या रोजच्या हालचालींकडे लक्ष ठेवले असून, अजूनही हा हत्ती मांगनूरच्या जंगलातच असल्याचे वनरक्षक सुनील भंडारी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com