Samudayik Vivah : अवघ्या सव्वा रुपयात केला जातोय थाटात विवाह सोहळा

Latest Marathi News : साईबाबांच्या शिर्डीत दोन मे रोजी विविध जाती धर्मांच्या एकशे एक जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Marriage
Marriage Agrowon
Published on
Updated on

Nagar News : साईबाबांच्या शिर्डीत दोन मे रोजी विविध जाती धर्मांच्या एकशे एक जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या चोवीस वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो. वधू-वरांकडून अवघे सव्वा रुपया शुल्क आकारून हा विवाह सोहळा थाटात होतो. आजपासून वधू-वरांच्या नाव नोंदणीस प्रारंभ झाला आहे.

‘बेटी पढाओ-बेटी बचाओ’ हे यंदाच्या सोहळ्याचे घोषवाक्य आहे. अशी माहिती या उपक्रमाचे संयोजक व माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी दिली. श्री. कोते म्हणाले, की कोविड प्रकोपामुळे ग्रामीण अर्थकारणाची घडी विस्कटली. त्यातच यंदा बऱ्याच जिल्ह्यात दुष्काळ आहे. हे लक्षात घेता विवाह सोहळ्यावरील वाढता खर्च अनेक कुटुंबांना झेपणारा नाही. सामुदायिक विवाह सोहळा हा या समस्येवरील सर्वोत्तम तोडगा आहे.

Marriage
Wedding Season: मुलगी जीवनसाथी निवडताना काय काळजी घेते?

हे लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्थांनी गरजू कुटुंबांपर्यंत शिर्डीच्या सामुदायिक विवाह सोहळ्याची माहिती पोचवावी व त्यांना या सोहळ्यात मुला-मुलींचे विवाह करण्यास प्रवृत्त करावे. साईंच्या नगरीत दरवर्षी हा सोहळा संत महंतांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात होतो. नववधूला सोन्याचे मंगळसूत्र, वधू-वरांना नवा पोशाख, संसारपयोगी वस्तू भेट दिल्या जातात.

Marriage
Rural Wedding : गावच्या लग्नातला सोयरीक जुळवणारा मध्यस्थी कुठे गेला?

वधू-वरांची थाटात मिरवणूक काढली जातो. विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि वऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन दिले जाते. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या सोहळ्याचे स्वागताध्यक्षपद भूषविणार आहेत.

या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होऊ इच्छिणाऱ्या नवरदेवाचे वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वय पूर्ण असावे. नाव नोंदणीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, फोटो आदी कागदपत्र आवश्यक आहेत. अनिल शेळके (मोबाइल क्रमांक ९०९६१७४०५०) एजाज पठाण (७३५०५०००९१) वाल्मीक बावचे (९८२३१४१७७४) शफीक शेख (९७६३२९८७१२) यांच्याकडे नाव नोंदणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com