Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Elephant Crop Damage : कोलझरमध्ये हत्तींचा धुमाकूळ

Wild Animal Crop Damage : दहा ते बारा दिवस घनदाट जंगलात ठाण मांडून बसलेल्या हत्तीच्या कळपाने रविवारी (ता. २०) जिल्ह्यातील कोलझरमध्ये धुमाकूळ घातला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : दहा ते बारा दिवस घनदाट जंगलात ठाण मांडून बसलेल्या हत्तीच्या कळपाने रविवारी (ता. २०) जिल्ह्यातील कोलझरमध्ये धुमाकूळ घातला आहे. गावातील नारळ, सुपारी, केळीच्या बागा हत्तींनी उद्ध्वस्त केल्या आहेत. जोरदार पावसामुळे वनविभागाला ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हत्तींचे लोकेशन मिळत नसल्यामुळे गस्तीपथक देखील निष्क्रीय ठरत आहे.

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यांतील गावांमध्ये हत्तींचा उपद्रव सुरू आहे. गेले पंधरा दिवस हत्ती कोलझरमधील घनदाट जंगलात होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून कोलझर, तळकट परिसरात हत्तींचा कळप अगदी वस्तीपर्यंत पोहोचला आहे.

रविवारी रात्री हत्तींनी कोलझरमधील शेतकरी अनिल देसाई, रूपेश वेटे, मेघशाम देसाई, शिवप्रसाद देसाई, श्रीधर देसाई, राजाराम देसाई, अर्जुन देसाई, विलास देसाई, भरत देसाई यांच्या नारळ, सुपारी, केळीच्या बागात उद्ध्वस्त केल्या.

श्रीधर देसाई यांच्या अगदी घरालगतच्या बागांचे नुकसान केले. दरम्यान वनविभागाने हत्तींवर पाळत ठेवण्यासाठी तयार केलेले गस्ती पथक निष्प्रभ ठरत आहे. पावसामुळे ड्रोन कॅमेऱ्याचा यशस्वीपणे वापर करता येत नसल्यामुळे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी हतबल आहेत. हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे कोलझर, तळकटमधील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हत्ती पकड मोहीम राबविणार कधी

दोडामार्गात सहा हत्तीचा कळप आहे. यातील गणेश आणि ओंकार या दोन हत्तींना पकडण्याचे वनविभागाने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी दोडामार्ग वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर पुन्हा हत्ती पकड मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु ही मोहीम राबविणार कधी? असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology: कंपोस्ट खते देण्यासाठी साइड ट्रेंचर, कंपोस्ट ॲप्लिकेटर

Jansuraksha Kayda: जनसुरक्षा कायदा नक्की कुणासाठी?

Maharashtra Logistic Park: ड्राय पोर्ट : नकोत कोरड्या घोषणा

Climate Change: हवामान बदलाचा विषय राजकीय अजेंड्यावर यावा 

Kharif Crop Damage: उसासह खरीप पिके ‘हुमणी’च्या विळख्यात

SCROLL FOR NEXT