
Sindhudurg News : जिल्ह्यातील कोलझर (ता.सावंतवाडी) येथे सहा हत्तींचा कळप धुडगूस घालत नारळ, सुपारी, केळी आदी पिके जमीनदोस्त करीत आहे. दरम्यान, हत्तीपकड मोहिमेसंदर्भात गुरुवारी (ता.१२) मुख्य वनसंरक्षक एस. रामानुजम यांच्या प्रमुख उपस्थितीत दोडामार्गात बैठक होत आहे.
कोलझरमध्ये सध्या हत्तीच्या कळपाने दहशत माजविली आहे. याशिवाय तळकट (ता.दोडामार्ग) मध्ये देखील सहा हत्तींच्या कळपाकडून गावात नुकसानसत्र सुरू आहे. गणेश आणि ओंकार हे दोन टस्कर प्रचंड आक्रमक झाले आहेत.
नारळ, सुपारी, केळी यांसह सर्व फळपिकांचे नुकसान हत्तीकडून सुरू आहे. सायकांळी सात वाजण्याच्या सुमारास हत्ती वस्तीत येत असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी रात्री कोलझर येथील शेतकरी रामचंद्र देसाई, नारायण देसाई, राजेंद्र देसाई, शिवप्रसाद देसाई, भूषण रेडकर, पेद्रु फर्नांडिस, शरद देसाई, या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तळकट गावातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान हत्तीकडुन सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हत्ती हटाव मोहिमेची मागणी शेतकऱ्यांकडून सुरू आहे.
जिल्हा सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस यांच्या ठिय्या आंदोलनानंतर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एस.रामानुजम यांच्या उपस्थित दोडामार्ग वनविभागाच्या कार्यालयात बैठक होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.